AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खुर्चीत बसून शारीरिक संबंधावेळी तरुणाला गळफास, नागपुरात तरुणीला अटक

काहीतरी वेगळं करण्याच्या नादात नागपूरच्या जोडप्याने हात पाय बांधून सेक्स करण्याचं ठरवलं आणि तरुणाच्या जीवावर बेतलं. (Nagpur Man dies while physical relations)

खुर्चीत बसून शारीरिक संबंधावेळी तरुणाला गळफास, नागपुरात तरुणीला अटक
| Updated on: Jan 11, 2021 | 12:03 PM
Share

नागपूर : पॉर्न फिल्म पाहून वेगवेगळ्या सेक्स पोझिशन करुन बघण्याच्या नादात नागपुरात तरुणाचा गळफास लागून मृत्यू झाला होता. या प्रकरणी युवतीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. लॉजवर शारीरिक संबंधांच्या वेळी हलगर्जी बाळगल्यामुळे तरुणाला प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती, मात्र तरुणाच्या वडिलांच्या तक्रारीनंतर युवतीवर गुन्हा दाखल करण्यात आला. (Nagpur Man dies while physical relations girl arrested)

मयत तरुण इंजिनिअर असून सध्या तो बेरोजगार होता. आरोपी 20 वर्षीय तरुणीसोबत गेल्या काही वर्षांपासून त्याचे प्रेमसंबंध होते. दोन वर्षांपूर्वी त्याने तरुणीशी लग्नही केलं होतं. काहीतरी वेगळं करण्याच्या नादात नागपूरच्या जोडप्याने हात पाय बांधून सेक्स करण्याचं ठरवलं.

लॉजमध्ये ‘वेगळं काहीतरी’ करण्याचा प्लॅन

संबंधित युवक-युवतीने गुरुवारी (सात जानेवारी) बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखला. दोघेही खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव (रंगारी) परिसरात असलेल्या महाराजा लॉजवर गेले. रुम बुक करुन दोघांनी शारीरिक संबंध ठेवले. यावेळी वेगवेगळ्या पोझिशनमध्ये शारीरिक संबंध ठेवताना दोघांनी दोरीचा उपयोग केला होता.

तरुण खुर्चीवर बसल्यानंतर त्याचे हात आणि पाय दोरीने बांधण्यात आले. त्याच वेळी ती दोरी त्याच्या गळ्याभोवतीही आवळली गेली. सेक्सनंतर तरुणी बाथरुममध्ये गेली असताना तरुण खुर्चीसह खाली कोसळला. यामध्ये त्याच्या गळ्याभोवती असलेला दोर आवळला गेला आणि गळफास लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

…तोपर्यंत तरुणाचा मृत्यू

तरुणी बाथरुमबाहेर आली, तोपर्यंत तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. प्राथमिक तपास करत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती, मात्र युवकाच्या वडिलांच्या तक्रारीवरुन तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तरुणीला अटक केली आहे.

संबंधित बातम्या :

सेक्स करताना झाला तरुणाचा मृत्यू, नागपूरमधल्या घटनेत प्रेयसीवर गुन्हा दाखल

पॉर्नसारखं प्रत्यक्षात करायला गेला आणि तो अलगद मृत्यूच्या जाळ्यात अडकला, नागपूरची भयंकर घटना

(Nagpur Man dies while physical relations girl arrested)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.