AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विवाहबाह्य प्रेम संबंध उघड होण्याच्या भीतीने तरुणाचा निर्घृण खून, नांदेडमध्ये विवाहित महिलेसह प्रियकराला अटक

विवाहबाह्य संबंधाची माहिती उघड करण्याची धमकी देणाऱ्याचा खून करण्यात आल्याची (Nanded Youth Murder) घटना नांदेडमध्ये घडली आहे.

विवाहबाह्य प्रेम संबंध उघड होण्याच्या भीतीने तरुणाचा निर्घृण खून, नांदेडमध्ये विवाहित महिलेसह प्रियकराला अटक
प्रतिकात्मक फोटो
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Feb 27, 2021 | 12:58 PM
Share

नांदेड : विवाहबाह्य संबंधाची माहिती उघड करण्याची धमकी देणाऱ्याचा खून करण्यात आल्याची (Nanded Youth Murder) घटना नांदेडमध्ये घडली आहे. देगलूर तालुक्यातील कुडली या गावातील ही घटना आहे. या गावातील एका विवाहित महिलेचे एका अविवाहित तरुणासोबत विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. याबाबत गावातील आणखी एका व्यक्तीला माहिती होती. तो आपल्या विवाहबाह्य प्रेम प्रकरणाबाबत कुठे वाच्यता करेल या भीतीने त्याचा खून करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी जोडप्याला अटक केली आहे (Nanded Youth Murder).

नेमकं प्रकरण काय?

नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील पोलीस ठाणे मरखेल अंतर्गत येणाऱ्या मौजे कुडली येथे विवाहबाह्य संबंधाचा उलगडा करणाऱ्या एका 27 वर्षीय युवकाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.

दरम्यान, पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मौजे कुडली येथील रहिवासी हानमंत पुंडलिक जाधव यांचा मुलगा जगदीश (वय 27) हा 1 जानेवारीपासून घरातून निघून गेला. नातेवाईकांकडे शोध घेतल्यानंतरही तो कुठेच सापडला नाही. त्यामुळे 6 जानेवारीला त्यांनी पोलीस ठाणे मरखेल येथे बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.

25 फेब्रुवारीला कुडली शिवारात एका अनोळखी इसमाच्या डोक्याची कवटी आढळून आल्याची माहिती मरखेल पोलिसांना मिळाली. पोलीस ठाणे मरखेलचे सहपोली निरीक्षक आदित्य लोणीकर आणि पोलीस उपनिरीक्षक अजित बिरादार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी चंदरबाई जाधव यांच्या शेतातील वाढलेल्या गवतात माणसाच्या अवयवाची काही हाडे, कपडे चप्पल आढळून आले. यावेळी पोलिसांनी जगदीश याचे वडील पुंडलिक जाधव यांना घटनास्थळी बोलावून घेतले. तेव्हा कपड्यावरुन त्यांनी आपलाच मुलगा असल्याची ओळख पटवली. त्यांनी आपल्या मुलाचा घातपात झाला असल्याची शंका व्यक्त केली.

नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या नेतृत्तवात पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे फिरवली. तब्बल एक महिन्याच्या तपासात अखेर सत्य घटनेचा छडा लावण्यात मरखेल पोलिसांना यश आले.

प्रेमाचा उलगडा करण्याच्या भीतीने खून

मृत जगदीश यांच्या शेजारी असलेली विवाहित महिला अनुसया संतोष गोंदे (वय 27) आणि त्याच गावात राहणारा शुभम मोहन चिलमपाढे (वय 22) यांच्यात प्रेम सूत जुळले. विवाहबाह्य ही प्रेम कहाणी शेजारी राहत असलेल्या जगदीशला कळाली. यातच जगदीश याबाबतची वाच्यता गावच्या माहिती पटलावर करण्याचे या दोघांना कळवले (Nanded Youth Murder).

प्रेमाचा उलगडा होणार, अशी भीती अनुसया गोंदे आणि शुभम चिलमपाडे यांना होती. यातच त्या दोघांनी मिळून जगदीशचा काटा काढायचं ठरवलं. त्यानंतर या दोघांनी जगदीशचा विश्वास संपादन करुन 2 जानेवारीला मध्यरात्री त्याला कुडली शिवारात घेऊन गेले. त्याच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्याच्या गुप्तांगावर, डोक्यावर आणि चेहऱ्यावर लाथाबुक्क्यांनी वार केले. त्यानंतर गळा आवळून त्याचा खून केला. ही घटना लपवण्यासाठी त्याचा मृतदेह चंदर बाई जाधव यांच्या शेतात नेऊन टाकण्यात आले, अशी कबुली स्वत: आरोपींनी दिले.

या दोघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर कलम 34/2021 नुसार 302, 301, 34 गुन्हे देखल केले आहेत. याप्रकरणी देगलूर न्यायालयाने त्यांना सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Nanded Youth Murder

संबंधित बातम्या :

मोठी बातमी: पुण्यात पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

ऐकावं ते नवल, हत्येच्या खटल्यात कोंबडा पोलीस कोठडीत, कोर्टासमोरही हजर करणार

बेल वाजवण्याच्या दोरीने बसमध्येच गळफास, कंडक्टरच्या आत्महत्येने मराठवाड्यात खळबळ

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...