बेल वाजवण्याच्या दोरीने बसमध्येच गळफास, कंडक्टरच्या आत्महत्येने मराठवाड्यात खळबळ

एसटी बस कंडक्टर संजय संभाजी जानकार ( 53 ) (Bus conductor Sanjay Jankar suicide) यांनी बेल वाजवण्याच्या दोरीने बसमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली.

बेल वाजवण्याच्या दोरीने बसमध्येच गळफास, कंडक्टरच्या आत्महत्येने मराठवाड्यात खळबळ
Nanded Bus conductor suicide

 नांदेड : आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेले संजय संभाजी जानकार ( 53 ) (Bus conductor Sanjay Jankar suicide) यांनी बेल वाजवण्याच्या दोरीने बसमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने नांदेड आगारासह मराठवाड्यात एकच खळबळ उडाली आहे.  कंडक्टर संजय जानकार यांनी आत्महत्या केल्याचं आज सकाळी उघडकीस आलं. सफाई कर्मचारी लक्ष्मीबाई व्यवहारे या आज सकाळी साफसफाई करत होत्या. त्यावेळी एस .टी.बस क्रमांक एम.एच. २० बी.एल .४०१५ मध्ये संजय जानकार हे बेल वाजवण्याच्या दोरीला लटकलेल्या अवस्थेत दिसले. (Maharashtra bus conductor Sanjay Jankar suicide at ST bus in Nanded ) याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस कर्मचारी विजय आडे, प्रकाश देशमुख यांनी घटनास्थळी पंचनामा केला.

संजय जानकार हे माहुर आगारात वाहक पदावर कार्यरत  होते. त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर येताच एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यात एकच खळबळ उडाली.   धक्कादायक म्हणजे जानकर यांनी आत्महत्येपूर्वी चार पाणी सुसाईड नोट लिहून कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सप ग्रुपवर शेअर केली.

तिकीट मशीनमध्ये बिघाडाचा उल्लेख

दोन दिवसापूर्वी माहूर यवतमाळ माहूर उमरखेड  या मार्गावर त्यांची ड्युटी होती.  त्यावेळी त्यांच्या एसटीमध्ये माहूरवरुन महागावसाठी तीन फुल्ल आणि एक हाफ तिकीट असलेले प्रवासी चढले.  मात्र मशीमध्ये बिघाड असल्याने साडेतीन ऐवजी एक तिकीट प्रिंट झाले.

त्यावरुन जानकर यांनी सुसाईड नोटमध्ये याबाबतचा उल्लेख केला आहे. “ईटीआयएम मशीन नादुरुस्त असल्याने वाहकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. बिघाड असलेल्या मशिनी द्वारे वाहक आपली कामगिरी बजावत आहे. खोट्या अहवालाने आता मला निलंबित केले जाईल नातेवाईकांसह आणि रा प म कर्मचाऱ्यात माझी बदनामी होईल , प्रत्येक जण मला चोर समजेल.त्यामुळे माझी बदनामी होईल.आगारात सदरची मशीन चेक केली जाईल , बिघाड दुरुस्त करून खोटा अहवाल दिला जाईल. व मला दोषी ठरविले जाईल. मशीन योग्य असती तर तिकीट योग्य निघाली असती माझी बदनामी झाली नसती. माझ्या आत्महत्येला प्रशासन जबाबदार आहे”, असा उल्लेख संजय जानकर यांच्या सुसाईड नोटमध्ये आहे.  ही सुसाईड नोट पोलिसांनी घटस्थळावरुन हस्तगत केली आहे.

संजय जानकर यांना दोन मुले पत्नी असा परीवार आहे. जानकर हे वाघी, नांदेड येथील रहिवासी होते.

संबंधित बातम्या

गोरेगावातील तृतीयपंथीय हत्याकांडाचा अखेर उलगडा, चौघे अटकेत   

Pooja Chavan case : 18 दिवसात 18 योगायोग आणि 18 विसंगती!  

(Maharashtra bus conductor Sanjay Jankar suicide at ST bus in Nanded )

Published On - 7:36 pm, Fri, 26 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI