मोठी बातमी: पुण्यात पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

मोठी बातमी: पुण्यात पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
नाना हंडाळ पुणे शहर पोलीस दलात पोलीस नाईक म्हणून काम करत होते.

नाना हंडाळ पुणे शहर पोलीस दलात पोलीस नाईक म्हणून काम करत होते. | Police Suicide

Rohit Dhamnaskar

|

Feb 27, 2021 | 8:01 AM

पुणे: पुण्यात एका पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना समोर आली आहे. नाना हंडाळ असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते बंडगार्डन पोलीस ठाण्यात कार्यरत होते. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. (Pune Police Employee suicide found dead in home)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना हंडाळ पुणे शहर पोलीस दलात पोलीस नाईक म्हणून काम करत होते. ते शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये डी इमारतीत राहत होते. त्यांना एक मुलगी आहे.  नाना हंडाळ यांनी शुक्रवारी संध्याकाळी 4 ते 7 च्या दरम्यान कुटुंबीय बाहेर गेल्यानंतर गळफास लावून घेतला. त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पुण्यातील टिकटॉक स्टार समीर गायकवाडची आत्महत्या

काही दिवसांपूर्वीच पुण्यातील टिकटॉक (Tik-Tok) स्टार समीर गायकवाड याने रविवारी घरातील पंख्याला साडीच्या साहाय्याने (Sameer Gaikwad Suicide) गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. प्रेमप्रकरणातून त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे. समीर पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये शिकत होता. तो म्युझिक व्हिडीओ आणि शॉर्ट व्हिडीओ बनवायचा. तो टिकटॉक स्टार म्हणूनही तरुणांमध्ये लोकप्रिय होता.

समीर गायकवाड हा Tik Tok या अॅपवर अतिशय लोकप्रिय होता. 22 वर्षीय त्याला हजारो लोक Tik Tok वर फॉलो करायचे. अनेक प्रकारचे व्हिडीओ तयार करुन तो Tik tok वर अपलोड करायचा. त्याचे व्हिडीओ नेटकऱ्यांच्याही पसंतीस उतरायचे. याशिवाय समीर गायकवाडच्या इन्स्टावरही तुफान फॉलोअर्स होते. इन्स्टावर त्याच्या फॉलोअर्सची संख्या 2 लाख 80 हजार इतकी आहे.

संबंधित बातम्या :

Video : उकळत्या तेलात हात घालून महिलेच्या चारित्र्यसंपन्नतेची परीक्षा! हा कसला न्यायनिवाडा?

डोक्यात वरवंटा घालून सासूचा खून, नंतर फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

टिकटॉक स्टार समीर गायकवाडची पुण्यात गळफास घेत आत्महत्या

(Pune Police Employee suicide found dead in home)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें