AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टिकटॉक स्टार समीर गायकवाडची पुण्यात गळफास घेत आत्महत्या

टिकटॉक स्टार समीर गायकवाड (TikTok Star Sameer Gaikwad suicide) याने रविवारी घरातील पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.

टिकटॉक स्टार समीर गायकवाडची पुण्यात गळफास घेत आत्महत्या
Sameer Gaikwad Suicide
| Edited By: | Updated on: Feb 22, 2021 | 11:31 AM
Share

पुणे : टिकटॉक (Tik-Tok) स्टार समीर गायकवाड याने रविवारी घरातील पंख्याला साडीच्या साहाय्याने (Sameer Gaikwad Suicide) गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. प्रेमप्रकरणातून त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे (Sameer Gaikwad Died By Suicide).

पुणे शहरातील वाघोलीतील केसनंद रस्त्यावरील मिकासा सोसायटीत टिकटॉक स्टार समीर मनीष गायकवाड (वय 22) रहात होता. तिथे त्याने रविवारी सायंकाळच्या सुमारास राहत्या घरात पंख्याला साडीच्या मदतीने गळफास लावला, अशी माहिती लोणीकंद पोलिसांनी दिली आहे. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याप्रकरणी त्याचा चुलत भाऊ प्रफुल्ल गायकवाड याने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

समीरने आत्महत्या केल्याचं कळताच प्रफुल्ल गायकवाडने लोणीकंद पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर समीरला खाली उतरवून तात्काळ लाईफ लाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

समीर पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये शिकत होता. तो म्युझिक व्हिडीओ आणि शॉर्ट व्हिडीओ बनवायचा. तो टिकटॉक स्टार म्हणूनही तरुणांमध्ये लोकप्रिय होता.

कोण होता समीर गायकवाड?

समीर गायकवाड हा Tik Tok या अॅपवर अतिशय लोकप्रिय होता. 22 वर्षीय त्याला हजारो लोक Tik Tok वर फॉलो करायचे. अनेक प्रकारचे व्हिडीओ तयार करुन तो Tik tok वर अपलोड करायचा. त्याचे व्हिडीओ नेटकऱ्यांच्याही पसंतीस उतरायचे. याशिवाय समीर गायकवाडच्या इन्स्टावरही तुफान फॉलोअर्स होते. इन्स्टावर त्याच्या फॉलोअर्सची संख्या 2 लाख 80 हजार इतकी आहे.

‘रेड लाईट डायरी’जचे समीर गायकवाड वेगळे

दरम्यान, काही माध्यमं आत्महत्या केलेले समीर गायकवाड हे ‘रेड लाईट डायरीज’चे लेखक असल्याचं म्हणत आहेत. मात्र लेखक समीर बापू आणि टिकटॉक स्टार समीर गायकवाड हे दोन्ही वेगळे आहेत. पुण्यात आत्महत्या केलेल्या समीर गायकवाडने अशी कुठलीही सिरीज किंवा ब्लॉग लिहिला नाही. तो केवळ Tik tok व्हिडीओ बनवायचा.

Sameer Gaikwad Died By Suicide

संबंधित बातम्या :

Video : उकळत्या तेलात हात घालून महिलेच्या चारित्र्यसंपन्नतेची परीक्षा! हा कसला न्यायनिवाडा?

डोक्यात वरवंटा घालून सासूचा खून, नंतर फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.