कापडणीस पिता-पुत्राच्या दुहेरी हत्याकांडाचे पुरावे हाती; मोखाडा घाटाने सारे वदवले, स्पिरीट टाकून चेहरा जाळला…!

| Updated on: Feb 21, 2022 | 9:23 AM

हॉटेल व्यावसायिक राहुल जगतापने कापडणीस यांच्या डॉक्टर मुलाशी मैत्री केली. जगताप कापडणीस यांच्या पत्नीचा विद्यार्थी होता. त्यामुळे अमितने राहुलवर विश्वास टाकला. त्यानंतर त्याने अमितला व्यसनी केले. कापडणीस यांना गुंगीचे औषध देऊन मोखाडाच्या काट्यात दरीत फेकले. तर अमितलाही मारून एका दरीत फेकले होते.

कापडणीस पिता-पुत्राच्या दुहेरी हत्याकांडाचे पुरावे हाती; मोखाडा घाटाने सारे वदवले, स्पिरीट टाकून चेहरा जाळला...!
डावीकडून अनुक्रमे नानासाहेब कापडणीस, डॉ. अमित आणि संशयित राहुल जगताप.
Follow us on

नाशिकः नाशिक (Nashik) येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस आणि त्यांचा डॉक्टर मुलगा अमित कापडणीस यांच्या अतिशय क्रूर पद्धतीने केलेल्या खुनाचे पुरावे (evidence) पोलिसांना (Police) सापडलेत. त्यामुळे या प्रकरणातील प्रमुख संशयित हॉटेल व्यावसायिक राहुल जगताप भोवतीचा शिक्षेचा फास आणखी घट्ट झालाय. कापडणीस कुटुंबाची नाशिकमध्ये प्रचंड प्रॉपर्टी आहे. पंडित कॉलनीमध्ये 4 प्लॅट, सावरकरनगरमध्ये 2 मोठे बंगले, 97 लाखांचे शेअर्स ट्रेडिंग, 20 लाखांची मुदतपूर्ण ठेव, 30 लाखांची मुदतपूर्ण ठेव, देवळाली कॅम्पमध्ये टोलेजंग रो-हाऊस, नानावलीत 14 लाखांचा गाळा. शिवाय इतरही अमाप संपत्ती आहे. कापडणीस पिता-पुत्र दोघेच नाशिकला राहायचे. त्यांची पत्नी व मुलगी मुंबईला राहायच्या. ही संधी साधून हॉटेल व्यावसायिक राहुल जगतापने कापडणीस यांच्या डॉक्टर मुलाशी मैत्री केली. जगताप कापडणीस यांच्या पत्नीचा विद्यार्थी होता. त्यामुळे अमितने राहुलवर विश्वास टाकला. त्यानंतर त्याने अमितला व्यसनी केले. कापडणीस यांना गुंगीचे औषध देऊन मोखाडाच्या काट्यात दरीत फेकले. तर अमितलाही मारून एका दरीत फेकले होते.

काय पुरावे हाती?

संशयित राहुल जगतापने कापडणीस यांचे शेअर्स विक्रीचे पैसे स्वतःच्या खात्यात वळवल्याचे समोर आले आहे. त्याने गिरणारे शिवारात नानासाहेब कापडणीस यांचा गळा आवळून खून केला. मोखाडा घाटात त्यांच्या चेहऱ्यावर स्पिरीट टाकून तो जाळला. कोणी ओळखू नये म्हणून मृतदेहाच्या अंगावरचे कपडे काढले. हे कपडे पोलिसांच्या हाती लागलेत. हा मृतदेह त्याने एका कारमधून नेला. तिची नंबर प्लेट बदलली. ती कार त्याने गो फिश हॉटेलसमोर उभी केली होती. ती ही पोलिसांनी जप्त केलीय. या कारमध्ये रक्ताचे डागही आढळलेत.

लॅपटॉप दिला आणून

जगतापने कापडणीस यांच्या मुलाचा लॅपटॉप एका दुकानदाराला त्यातील माहिती काढण्यासाठी दिला होता. मात्र, खुनाला वाचा फुटल्यानंतर त्या दुकानदाराने हा लॅपटॉप सरकारवाडा पोलिसांना आणून दिलाय. शिवाय हॉटेल व्यावसायिक जगताप याच्या घरी कापडणीस यांचे एटीएम कार्ड, चेकबुक, त्यांचे एटीएमचे पिन असलेली वही सापडलीय. कापडणीस पिता-पुत्राचे मृतदेह यापूर्वीच पोलिसांनी अनोळखी म्हणून पुरले आहेत. ते काढून कापडणीस कुटुंबीयांची डीएनए टेस्टही केली जाणारय. त्यामुळे संशयिताभोवतीचे भक्कम पुरावे जमा झालेत.

इतर बातम्याः

पब्लिक सब जानती है, कोणावर कशी कारवाई होते, काही लोक भाजपमध्ये का गेले?; भुजबळांचा राणेंना टोला

‘राष्ट्रवादी’कडून इच्छुकांची चाचपणी; नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीचे पडघम जोरात

शिवजयंतीच्या मुहूर्तावर केबल कार्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे उद्घाटन; नाशिकमधून परदेशात होणार निर्यात