Nashik : पहिल्या मजल्यावरील बाल्कनीतून पडून 18 महिन्यांची समृद्धी जागीच ठार! नाशिकमधील दुर्दैवी घटना

| Updated on: Aug 10, 2022 | 10:58 AM

Nashik News : या घटनेमुळे चिमुकलीच्या आईवडिलांवर मोठा आघात झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे.

Nashik : पहिल्या मजल्यावरील बाल्कनीतून पडून 18 महिन्यांची समृद्धी जागीच ठार! नाशिकमधील दुर्दैवी घटना
दुःखद घटना
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

नाशिक : पहिल्या मजल्यावरुन पडून 18 वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू (Nashik News) झालाय. या घटनेमुळे चिमुकलीच्या आईवडिलांवर मोठा आघात झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे. नाशिकच्या पवन नगर (Pawan Nagar, Nashik) ज्योती अपार्टमेन्ट (Jyoti Aprtment, Nashik) मध्ये ही दुःखद घटना घडली. समृद्धी राहुल खैरनार असं 18 वर्षांच्या मृत चिमुकलीचं नाव आहे. बाल्कनीत खेळत असताना समृद्धीचा तोल गेला आणि समृद्धी पहिल्या मजल्यावरुन खाली कोसळली. समृद्धीच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय. या घटनेमुळे राहुल खैरनार आणि खैरनार कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या दीड वर्षांच्या समृद्धीच्या मृत्यूने लहान मुलांना एकटं बाल्कनीत सोडणं किती धोकादायक आणि जीवघेणं ठरु शकतं, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.

ही घटना घडली तेव्हा या मुलाचे आई-वडील नेमके कुठे होते, याची माहिती मिळू शकलेली नाही. बाल्कनीत खेळत असतेवेळी घडलेल्या या दुर्घटनेबाबत कळल्यानंतर परिसरातील सगळ्यांनाच धक्का बसलाय. याप्रकरणी आता अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील कारवाई केली जातेय. या दुर्दैवी घटनेबाबत कळल्यानंतर चिमुरड्या समृद्धीच्या आई वडिलांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.

गेल्या पंधरा दिवसातली दुसरी घटना

आठवड्याभरापूर्वीच वसईतही अशाचप्रकारे बाल्कनीतून पडून एका चिमुकलीचा मृत्यू झाला होता. मुंबईच्या जवळच असलेल्या वसईत ही दुर्दैवी घटना घडली होती. वसईच्या पश्चिमेला असलेल्या अग्रवाल कॉम्लेक्समधील रेजन्सी विला या इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन खाली पडल्यानं श्रेया महाजन या अवघ्या साडेतीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला होता. श्रेया यावेळी घरात एकटीच होती. श्रेयाची आई तिच्या बहिणीला शाळेत सोडायला गेली होती. त्यावेळी मोबाईलमध्ये खेळता खेळता श्रेया बाल्कनीत आली आणि तोल जाऊन थेड खाली कोसळली होती. या घटनेमुळे महाजन कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता.

हे सुद्धा वाचा

गेल्या 15 दिवसांत दोघा चिमुकलींचा बाल्कनीनूत कोसळून मृत्यू झाल्यामुळे लहान मुलांवर आता बारीक लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त केली जातेय. बाल्कनी, जिने, उंचावरील ठिकाण, गिल नसलेल्या खिडक्यांपासून मुलांना लांब ठेवणं, एकटं लिफ्टमधून न पाठवणं, या सगळ्या गोष्टीजवळ मुलांनी विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचं अधोरेखित झालंय.