हत्येच्या गुन्ह्यातून निर्दोष सुटका, नाशकात आठ कैद्यांची जंगी मिरवणूक, समर्थकांनी खांद्यावर नाचवलं

नाशिक कारागृहाबाहेर आलेल्या आठ कैद्यांचं कारागृहाबाहेर जल्लोषात स्वागत करण्यात आलं. (Nashik Prisoners Procession Dance )

हत्येच्या गुन्ह्यातून निर्दोष सुटका, नाशकात आठ कैद्यांची जंगी मिरवणूक, समर्थकांनी खांद्यावर नाचवलं
नाशिकमध्ये निर्दोष सुटलेल्या आठ कैद्यांची मिरवणूक
Follow us
| Updated on: Apr 02, 2021 | 12:13 PM

नाशिक : कारागृहातून सुटका झाल्यानंतर मिरवणूक आणि धांगडधिंगा घालण्याचा नवा ट्रेण्ड गुन्हेगारांमध्ये रुजतोय का, अशी शंका उपस्थित आहे. कारण नाशिकमध्ये हत्येच्या गुन्हयात निर्दोष सुटलेल्या आठ कैद्यांची कारागृहाबाहेर मिरवणूक काढण्यात आली. या प्रकरणी 17 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. (Nashik Eight Prisoners Procession Dance after acquitted from Jail)

नाशिक कारागृहाबाहेर आलेल्या आठ कैद्यांचं कारागृहाबाहेर जल्लोषात स्वागत करण्यात आलं. ढोल-ताशाच्या गजरात या कैद्यांची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. नाशिकमध्ये काल दुपारी ही घटना घडली.

हत्येच्या गुन्ह्यातील प्रशांत बागूल, आतिश निकम, निवृत्ती बनकर, आकाश खताळे यांच्यासह एकूण आठ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. जल्लोष करणाऱ्या एकूण 17 जणांना नाशिक रोड पोलिसांनी अटक केली. नऊ वाहनेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.

गजा मारणेची तीनशे गाड्यांसह मिरवणूक

तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर गजा मारणेची मिरवणूक काढण्यात आली होती. त्याच्या साथीदारांनी उर्से टोल नाका येथे थांबून फटाके वाजवून आरडा-ओरडा केला होता. या सर्वाचे ड्रोन कॅमराने चित्रीकरण करून दहशतीचे वातावरण निर्माण केले.

2014 पासून तुरुंगात, सात वर्षांनी सुटका

गुंड गजाजन मारणे याच्यावर 2014 मधील दोन हत्या प्रकरणात कारवाई करण्यात आली होती. पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणी गजा मारणे आणि समर्थकांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. गजाला 2014 पासून पुण्यातील येरवडा जेलमध्ये ठेवण्यात आले होते. तब्बल सात वर्षांनंतर गजाची सुटका झाली. (Nashik Eight Prisoners Procession Dance after acquitted from Jail)

तडीपार गुंडाचा पुण्यात हैदोस

तडीपार गुंडाने हातात कोयता घेऊन डान्स केल्याचा प्रकार पुण्यात शिवजयंतीला घडल्याचं उघडकीस आलं आहे. गुंड रोशन लोखंडे याने दहशत निर्माण केल्याचा व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे रोशनसोबत नाचणाऱ्या एका गुंडाच्या हातात पिस्तुलही दिसत आहे.

संबंधित बातम्या :

गजा मारणेची मिरवणूक काढणाऱ्या आठ जणांना अटक; भाजप पदाधिकाऱ्याचा समावेश

VIDEO | गुंड गजा मारणेला सातारा पोलिसांनी कसं पकडलं?, पाहा थरारक CCTV फुटेज

(Nashik Eight Prisoners Procession Dance after acquitted from Jail)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.