Nashik News : ऐकावं ते नवलच !चोरीला गेलेला रस्ता शोधणाऱ्याला पाच लाखांचे बक्षिस, पथकाची झाली दमछाक

याप्रकरणी गावातील विठोबा यांनी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात रस्ता चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली आहे. रस्ता चोरीची फिर्याद दाखल झाल्याने पोलिसांसमोर मोठे आवाहन उभे राहिले आहे.

Nashik News : ऐकावं ते नवलच !चोरीला गेलेला रस्ता शोधणाऱ्याला पाच लाखांचे बक्षिस, पथकाची झाली दमछाक
पथकाची झाली दमछाक
Image Credit source: tv9marathi
| Edited By: | Updated on: Jan 21, 2023 | 10:12 AM

मालेगाव : नाशिक (Nashik News) जिल्ह्यातील मालेगावमध्ये (Malegaon) रस्ता चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. रस्ता शोधून देणाऱ्यास पाच लाख रुपयांचे बक्षिस ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे चोरीला गेलेला रस्ता शोधण्यासाठी प्रशासनाने पथकाची नेमणूक केली असल्याची माहिती मिळाली आहे. पण रस्ता शोधत असताना पथकाची दमछाक झाली आहे. नाशिक जिल्ह्यात रस्ता चोरीला गेल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली असल्यामुळे सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. या प्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये (Nashik Malegaon Police) तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस रस्त्याचा शोध घेत आहेत.

पोलिसांना वाटलं आश्चर्य

मागच्यावर्षी मालेगाव तालुक्यातील टोकडे येथे 18 लाख रुपये खर्च करुन तयार करण्यात आलेला रस्ता वर्षभरातच चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाल्यामुळे पोलिस आश्चर्य व्यक्त करीत आहेत. पोलिसांच्या पथकाने शोध घेवून देखील रस्ता न मिळून आल्याने कार्यकारी अभियंता यांचे एक पथक मालेगावच्या टोकडे येथे दाखल झाले. संपूर्ण गाव परिसरासह जंगल परिसरात शोध घेतला, मात्र रस्ता न मिळून आल्याने पथकाची दमछाक झाली. दरम्यान, हा रस्ता शोधून देणाऱ्या व्यक्तीला यापूर्वी जाहिर करण्यात आलेल्या बक्षिसात भरघोस वाढ करीत बक्षिसाची रक्कम पाच लाख रुपये करण्यात आली आहे.

या व्यक्तीने केली तक्रार

तालुक्यातील टोकडे येथे मार्च 2022 मध्ये 18 लाख रुपये खर्च करुन रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र कागदोपत्री झालेला रस्ता अवघ्या काही दिवसातच चोरीला गेला. याप्रकरणी गावातील विठोबा यांनी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात रस्ता चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली आहे. रस्ता चोरीची फिर्याद दाखल झाल्याने पोलिसांसमोर मोठे आवाहन उभे राहिले आहे.