नाशिकमध्ये मनसे नेत्याची आत्महत्या, राजकीय वर्तुळात खळबळ

नाशिकमधील मनसे नेते नंदू शिंदे यांच्या आत्महत्येनं खळबळ उडाली आहे. (Nandu Shinde Suicide)

नाशिकमध्ये मनसे नेत्याची आत्महत्या, राजकीय वर्तुळात खळबळ
नंदू शिंदे, मनसे
Follow us
| Updated on: Apr 07, 2021 | 6:32 PM

नाशिक: जिल्ह्यातील मनसेचे नेते नंदू शिंदे (Nandu Shinde)यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. नंदू शिंदे यांच्या आत्महत्येमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. नंदू शिंदे यांच्या आत्महत्येचं कारण समोर आलेलं नाही. नंदू शिंदे यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. (Nashik MNS leader Nandu Shinde Commit suicide by shot himself)

नंदू शिंदे यांच्या आत्महत्येचा तपास सुरु

कामटवाडे येथील मनसे नेते नंदू शिंदे यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. पोलिसांनी नंदू शिंदे यांच्या आत्महत्येचा तपास सुरु केला आहे. सटाणा साक्री रोडवर स्कोडा गाडीत बसून स्वतःवर गोळी झाडली.

आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट

मनसेचे नेते नंदू शिंदे यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. नंदू शिंदे यांच्या आत्महत्येची कारणं पोलीस तपासानंतर समोर येण्याची शक्यता आहे. नंदू शिंदे सटाणाहून नाशिककडे जात असताना त्यांनी गाडी स्कोडा गाडी रस्त्याच्या बाजूला थांबवली आणि गोळी झाडून घेत आत्महत्या केली. शिंदे यांच्या आत्महत्येमुळं राजकीय आणि व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.

नंदू शिंदे यांच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव  घेतली. पोलिसांनी घटनास्थळावरुन नंदू शिंदे यांनी ज्या बंदुकीतून गोळी झाडून घेतली ती ताब्यात घेतली आहे. घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर शिंदे यांचा मृतदेह पोस्टमॉर्टम करण्यासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. नंदू शिंदे हे राजकीय क्षेत्रासह उद्योजक म्हणून देखील परिचित होते. नंदू शिंदे यांच्या आत्महत्येपूर्वी नातेवाईकांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे.

संंबंधित बातम्या: 

परमबीर सिंग NIA कार्यालयात, वाझेंची नियुक्ती ते हायप्रोफाईल तपास, चौकशीत 9 महत्त्वाच्या प्रश्नांवर भर

अहमदनगरमध्ये पत्रकाराची दगडाने ठेचून हत्या, राहुरीत मृतदेह आढळला

परमवीर सिंगांच्या सूचनेने वाझेंकडे हायप्रोफाईल केसेस, नगराळेंच्या अहवालात धक्कादायक खुलासे

(Nashik MNS leader Nandu Shinde Commit suicide by shot himself)

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.