परमबीर सिंग NIA कार्यालयात, वाझेंची नियुक्ती ते हायप्रोफाईल तपास, चौकशीत 9 महत्त्वाच्या प्रश्नांवर भर

परमबीर सिंग NIA कार्यालयात, वाझेंची नियुक्ती ते हायप्रोफाईल तपास, चौकशीत 9 महत्त्वाच्या प्रश्नांवर भर
परमबीर सिंग यांची एनआयए चौकशी

मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांनी गृह खात्याला पाठवलेल्या अहवालात माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग (Param Bir Singh) यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे (Param Bir Singh NIA enquiry)

अनिश बेंद्रे

|

Apr 07, 2021 | 10:52 AM

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) सकाळीच एनआयए कार्यालयात दाखल झाले आहेत. अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन संशयास्पद मृत्यू या दोन्ही प्रकरणांचा तपास करणारी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) परमबीर सिंग यांचीही चौकशी करण्याची शक्यता आहे. सचिन वाझेंची नियुक्ती आणि इतर विषयांवर परमबीर सिंह यांना प्रश्न केले जाऊ शकतात. (Param Bir Singh NIA enquiry in Sachin Vaze Case)

परमबीर सिंह यांना कोणते प्रश्न विचारण्याची शक्यता?

1. परमबीर सिंह आयुक्त झाल्यानंतर सचिन वाझे यांची मुंबई पोलिस दलात नियुक्ती कुठल्या आधारावर करण्यात आली?

2. सचिन वाझेंना कुणाच्या सांगण्यावरुन पोलिस दलात घेतले?

3. सर्व महत्त्वाचे गुन्हे वाझेंनाच का? इतर वरिष्ठ अधिकारी असताना वाझेंनाच अँटिलिया स्फोटक प्रकरण तपासासाठी का दिले?

4. या संपूर्ण गुन्ह्यात वाझेंचा सहभाग निश्चित झाल्यानंतरही तातडीने केस का वर्ग केली नाही, चालढकलपणा का केला?

5. अटकेपूर्वी वाझे परमबीर सिंग यांना रिपोर्टिंग करत होते. त्यावेळी तासनतास परमबीर यांची वाझेंसोबत बैठक होत होती. या बैठकीत वाझे काय सांगायचे?

6. गुन्ह्यात सचिन वाझेंचा सहभाग माहिती होता का?

7. जैश उल हिंद दहशतवाद संघटनेची तपासणी खासगी सायबर संस्थेकडून का करण्यात आली?

8. गुन्ह्यात वापरलेल्या गाड्या पोलिस आयुक्तालयात कशा आल्या?

9. सचिन वाझे इतरांपेक्षा जवळचे का?

दरम्यान, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांनी गृह खात्याला पाठवलेल्या अहवालात माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग (Param Bir Singh) यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. सचिन वाझे (Sachin Vaze) यांची पुनर्नियुक्ती परमवीर सिंग यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत करण्यात आली होती. मुंबई पोलीस आयुक्तांनी गृह खात्याला पाठवलेला अहवाल ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागला आहे. (Param Bir Singh NIA enquiry in Sachin Vaze Case)

विरोधानंतरही परमबीर सिंगांकडून वाझेंची नियुक्ती

तत्कालीन पोलीस सह आयुक्त (गुन्हे) यांचा सचिन वाझे यांच्या‌ नियुक्तीला विरोध असतानाही परमवीर सिंग यांनी त्यांची नियुक्ती केली, असा खुलासा अहवालात करण्यात आला आहे. वाझे सर्वसाधारण पोलीस निरीक्षक असतानाही ते थेट परमवीर सिंग यांना रिपोर्ट करायचे. विविध हायप्रोफाईल प्रकरणांचा तपास परमवीर सिंग यांच्या सांगण्यानुसार वाझेंकडे‌ देण्यात आला होता, असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

मंत्र्यांच्या ब्रीफिंगवेळीही वाझेंची उपस्थिती

सचिन वाझे यांच्या टीममधल्या व्यक्तींना त्यांच्या वरिष्ठांना रिपोर्टिंग करण्यास मनाई करण्यात आली होती. हायप्रोफाईल प्रकरणात‌ मंत्र्यांच्या ब्रीफिंगवेळी परमवीर सिंग यांच्याबरोबर सचिन वाझेसुद्धा हजर राहायचे. सरकारी गाड्या उपलब्ध असताना वाझे मर्सिडिज, ऑडी या वाहनांनी कार्यालयात यायचे, याकडे अहवालात लक्ष वेधले आहे.

कार्यकारी पद दिल्यामुळे विरोध

निलंबित पोलीस अधिकाऱ्याला परत सेवेत घेतल्यास अकार्यकारी पद देण्याचे संकेत आहेत. मात्र सचिन वाझेंना सेवेत घेऊन कार्यकारी पद दिल्यामुळे विरोध झाला होता. सचिन वाझे यांना सीआययूच्या प्रमुखपद देण्याालही विरोध झाला होता. सीआययूचे रिपोर्टिंग तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे असल्याची माहिती आहे.

संबंधित बातम्या :

परमवीर सिंगांच्या सूचनेने वाझेंकडे हायप्रोफाईल केसेस, नगराळेंच्या अहवालात धक्कादायक खुलासे

CCTV VIDEO | मनसुख हिरेनचा मृतदेह सापडल्याच्या आदल्या रात्री सचिन वाझे ‘तिथे’ दिसले

सचिन वाझेंना घेऊन NIA टीमचा लोकल ट्रेनने प्रवास; CSMT आणि कळवा स्थानकात क्राईम सीन रिक्रिएट

(Param Bir Singh NIA enquiry in Sachin Vaze Case)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें