रक्त तपासणीचा धक्कादायक प्रकार, घटनेनं नाशिक शहर हादरलं; प्रकरण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल

| Updated on: Mar 18, 2023 | 9:47 AM

नाशिक शहरात रक्त तपासणीच्या बाबत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई नाका पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला असून एकाला अटक करण्यात आली आहे.

रक्त तपासणीचा धक्कादायक प्रकार, घटनेनं नाशिक शहर हादरलं; प्रकरण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : नाशिकच्या अशोका मार्ग परिसरात रक्त तपासण्याच्या संदर्भात एक धक्कादायक ( Crime News ) प्रकार समोर आला आहे. महिलेच्या जीवीतला धोका निर्माण केल्याप्रकरणी दोघांच्या विरोधात मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाने नाशिक शहरातील आरोग्य विभागात ( Health Department ) खळबळ उडाली आहे. अशोका मार्ग परिसरात राहणाऱ्या महिलेचे रक्त तपासणीचे खोटे रिपोर्ट देत तिच्या जीविताला धोका निर्माण केल्याप्रकरणी दोघा संशयितांविरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेणुका नगर परिसरात राहणारी महिला आणि कामटवाडे परिसरात राहणारा संशयित उदय नारायण सिंग यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिझवान रमजान भोख यांच्या फिर्यादीनुसार रिझवान यांची पत्नी यांच्या रक्त तपासणीचा रिपोर्ट संशयित दोघांनी संगनमताने खोटा तयार करून दिला. त्यावरून पत्नी हिला संशयितांकडून चुकीचे औषधोपचार होऊन त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मुंबई नाका पोलिसांनी याबाबत फिर्यादीवरुन दोघांवर गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपास मुंबई नाका पोलिस करीत आहे. याबाबत महिलेची तब्येतीला धोका निर्माण झाला म्हणून गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आता काय कारवाई होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा

यापूर्वीही नाशिक शहरात कोविड काळात रक्त चाचणी आणि इतर चाचण्यांच्या संदर्भात अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. मात्र, त्याबाबत कुठलाही गुन्हा दाखल झाला नव्हता, त्यामुळे तक्रारीकडे एकप्रकारे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले होते, मात्र आता थेट गुन्हाच दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

महिलेच्या रक्त चाचणीनंतर तिला दिला जाणारा अहवाल हा दुसऱ्या व्यक्तीचा होता, त्यामुळे महिलेच्या जिवाला धोका निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला असून त्यात प्राथमिक चाचणीत लॅबचा कर्मचारी दोषी आढळून आले आहे.

नाशिक शहराचे पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली आहे. या प्रकरणातील पुरुष संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे पुढील तपासात काय समोर येते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.