AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2026 : 2 दिग्गज खेळाडू T20 वर्ल्डकपमधून बाहेर, मोक्याच्या क्षणी कर्णधार बदलावा लागणार

ICC T20 World Cup 2026 : आयसीसी टी 20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या सुरुवातीलाच काही संघांना मोठे धक्के बसले आहेत, दोन संघांचे स्टार खेळाडू संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

T20 World Cup 2026 :  2 दिग्गज खेळाडू T20 वर्ल्डकपमधून बाहेर, मोक्याच्या क्षणी कर्णधार बदलावा लागणार
Taylor and stirlingImage Credit source: Google
| Updated on: Feb 13, 2026 | 3:31 PM
Share

भारत आणि श्रीलंकेत आयसीसी टी 20 वर्ल्डकप 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. सध्या स्पर्धेत लीग स्टेजचे सामने खेळवले जात आहेत. अशातच आता स्पर्धेच्या सुरुवातीलाच काही संघांना मोठे धक्के बसले आहेत, दोन संघांचे स्टार खेळाडू संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. हे दोन्ही खेळाडू क्रिकेट जगतातील सुप्रसिद्ध नावे आहेत, त्यांच्यात एकहाती सामना फिरवण्याची क्षमता आहे, त्यामुळे य दोन्ही संघांना मोठा धक्का बसला आहे. हे खेळाडू कोण आहेत ते सविस्तर जाणून घेऊयात.

झिम्बाब्वेला मोठा धक्का

झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत खळबळ उडवून दिली आहे. मात्र या सामन्यापूर्वी झिम्बाब्वेला मोठा धक्का बसला. 40 वर्षीय यष्टीरक्षक-फलंदाज ब्रेंडन टेलर हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे स्पर्धेतील उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा याने याबाबत माहिती दिली. टेलरला ओमानविरुद्धच्या सामन्यात ही दुखापत झाली होती, त्यामुळे 30 चेंडूत 31 धावा काढल्यानंतर तो निवृत्त झाला होता. विकेटकीपिंग करताना त्याने तीन झेलही घेतले होते, मात्र आता तो उर्वरित स्पर्धेचा भाग असणार नाही.

बेन करनचा संघात समावेश

ब्रेंडन टेलरच्या जागी आता बेन करनचा संघात आता समावेश करण्यात आला आहे. करनने याआधी कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळलेले आहेत, मात्र तो पहिल्यांदाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळताना दिसणार आहे. तो संघात सामील झाल्यामुळे झिम्बाब्वेच्या फलंदाजीला काही बळकटी मिळणार आहे.

या संघाचा कर्णधार बाहेर पडला

आयर्लंडलाही मोठा धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार आणि सलामीवीर पॉल स्टर्लिंग गुडघ्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. बुधवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात या संघाला 67 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता, त्याच सामन्यात स्टर्लिंग जखमी झाला होता. क्षेत्ररक्षण करताना कॅच घेताना तो गुडघ्यावर पडला. त्यानंतर फलंदाजी करताना धाव घेताना त्याची दुखापत आणखी वाढली. त्यानंतर स्कॅनमध्ये लिगामेंट फाटल्याचे झाल्याचे दिसून आले. त्यामुळे तो आता उर्वरित स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही.

सॅम टॉपिंगचा संघात समावेश

पॉल स्टर्लिंगच्या जागी अनकॅप्ड युवा फलंदाज सॅम टॉपिंगचा आयर्लंडच्या संघात समावेश करण्यात आला आहे. टॉपिंग हा सलामीवीर फलंदाज आहे. तो पहिल्यांदाच आयर्लंड कडून खेळताना दिसणार आहे. तो आता डावाची सुरुवात करण्याची शक्यता आहे. मात्र संघाला आता नवा कर्णधार शोधावा लागणार आहे.

Follow Us
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व...
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
Sachin Ahir | ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! सचिन अहिर यांनी ठणकावू सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
Sachin Ahir Exclusive| 6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना नेमका काय इशारा?
राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया...
Sudhir Mungantiwar | राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, योगी आदित्यनाथ...
56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी
Sudhir Mungantiwar | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी; एकही शेतकरी वंचित राहणार नाही - सुधीर मुनगंटीवार
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून...
Kalyan News | कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून नागरिकांची जीवघेणी कसरत
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने खळबळ, नेमका रोख कोणाकडे?