पोटच्या पोराला जपलं नाही तितकं शेतमालाला जपलं, पण एका रात्रीत असं काही घडलं की, बळीराजाच्या अश्रूंचा बांध फुटला…

| Updated on: Mar 31, 2023 | 5:17 PM

नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आता नवं संकट उभं राहिलं आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटातून वाचवलेला शेतमाल विक्रीसाठी आलेला असताना आता त्यावर चोरटे डल्ले मारू लागलेले आहेत.

पोटच्या पोराला जपलं नाही तितकं शेतमालाला जपलं, पण एका रात्रीत असं काही घडलं की, बळीराजाच्या अश्रूंचा बांध फुटला...
Image Credit source: TV9 Network
Follow us on

नाशिक : कधी अस्मानी संकट तर कधी सुलतानी संकट यामुळे बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस आणि त्यानंतर गारपीटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातून कसाबसा शेतमाल वाचवलेला असताना आता तो बाजारात विकला जाईल अशी स्थिती आहे. त्यामुळे दोन पैसे मिळतील अशी परिस्थिती असतांना त्यावर चोरटे डल्ला मारू लागलेले आहेत. खरंतर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर रात्रीच्या वेळी आता द्राक्ष बागेच्या शेतात पहारा देण्याची वेळ आली आहे. आता द्राक्ष बागेसाठी सीसीटीव्ही लावायचे का असा प्रश्नही शेतकरी विचारू लागलेले आहेत. त्याचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून द्राक्ष चोरी होण्याचे प्रमाण वाढलेलं आहे. नाशिकच्या दीक्षी परिसरात आता द्राक्ष चोरी करणारी टोळी सक्रिय असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.

नाशिकच्या निफाड तालुक्यातील दिक्षी गावातील बाळासाहेब चौधरी यांच्या शेतातील पर्पल द्राक्ष रात्रीच्या वेळेला चोरी गेला आहे. तब्बल 16 ते 17 झाडांचा द्राक्ष चोरीला गेला असून साधारणपणे पाऊण लाख रुपयांचा द्राक्ष चोरीला गेल्याने चौधरी यांना मोठा फटका बसलाय.

खरं म्हणजे बाळासाहेब चौधरी यांच्या द्राक्ष बागेचा काही दिवसांपूर्वी सौदा झाला होता. 70 रुपये किलोने त्यांचा द्राक्ष विकला गेला होता. दोन ते तीन दिवसांमध्ये द्राक्ष काढला जाणार होता. त्यामुळे द्राक्ष बागेचे दोन पैसे होतील अशा अपेक्षांना शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद होता.

हे सुद्धा वाचा

मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही. असाच काहीसा आनंद काही दिवसांपूर्वी चौधरी यांच्या शेताच्या बाजूला असलेल्या एका गोदामातून चोरीला गेला होता. 25 कॅरेट द्राक्ष अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. त्याबाबत ओझर पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती.

दोन वर्षांपूर्वी अशीच काहीशी परिस्थिती नाशिक जिल्ह्यात निर्माण झाली होती. ठिकठिकाणी द्राक्ष बागेतून द्राक्ष चोरीला जात होते. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळेला द्राक्ष बागेला पहारा देण्याची वेळ आली होती. आता पुन्हा तशीच वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपलेली आहे.