25 वर्षीय तरुणाने तिला फूस लावली आणि… सहा महिन्यांनी समोर आली आपबीती, ऐकून धक्काच बसेल

| Updated on: Mar 21, 2023 | 1:56 PM

नाशिक ग्रामीण पोलिसांनी तब्बल सहा महिन्यांनी एका अल्पवयीन मुलीचा शोध लावला आहे. सहा महिन्यांनी उघडकीस आलेला हा गुन्हा संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

25 वर्षीय तरुणाने तिला फूस लावली आणि... सहा महिन्यांनी समोर आली आपबीती, ऐकून धक्काच बसेल
crime news
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : मागील वर्षातील सप्टेंबरमध्ये वावी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती. त्यानंतर तिच्या वडिलांनी वावी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती त्यावरून अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर जवळपास सहा महीने अपहरण झालेल्या मुलींच्या वडिलांनी पोलिस ठाण्याचे उंबरठे झिजवले होते. मात्र, मुलीचा शोध लागत नसल्याने वैतागलेल्या मुलीच्या वडिलांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले होते. आंदोलन करत आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आणि त्यानंतर लागलीच पोलिस ठाण्यातील पोलिस नियुक्तीपासून सर्वच यंत्रणा अलर्ट झाली होती.

नाशिक जिल्ह्यातील येथून अल्पवयीन मुलीला पळवून नेण्यापासून ते मुलीचा सध्या पत्ता कुठे आहे यासाठी पोलिसांनी तांत्रिक बाबींचा शोध घेण्यासाठी मोठे प्रयत्न केले पण यश येत नव्हते. त्यानंतर बेपत्ता झालेल्या मुलीसोबत आणखी कोण फरार आहे याचा शोध घेण्यात आला होता.

त्यासाठी तळेगाव दिघे येथील अनिल दिघे याने अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या संपूर्ण कुटुंबाला ताब्यात घेऊन चौकशी केली. मात्र, त्यामध्ये कुठलाही शोध लागत नव्हता. त्यांच्याकडूनही कुठलाही प्रतिसाद दिला जात नव्हता.

हे सुद्धा वाचा

अनिल दिघे हा पोलिसांच्या हाती लागणार नाही याची पूर्ण काळजी घेत होता. अनिल हा गावातील कुठल्याही व्यक्तीशी फोनवर संवाद साधत नव्हता त्यामुळे त्याचा शोध लागणे कठीण झाले होते. तांत्रिक बाबींचा सहारा घेऊन नाशिक ग्रामीण पोलिसांनी संशयित आरोपी अनिल दिघे याचा अखेर शोध घेतला.

धारशीव येथून अनिल दिघेसह मुलीला ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले. तब्बल सहा महिन्यांनी मुलीचा शोध लागल्याने वडिलांसह कुटुंबाने सुटकेचा निश्वास टाकला. या कारवाईत स्वतः ग्रामीण पोलिस अधिक्षक शहाजी उमाप यांनी लक्ष घातलं होतं म्हणून हा गुन्हा उघडकीस आल्याचे बोललं जात आहे.

यामध्ये मुलीने पोलिसांना धक्कादायक बाबी सांगितल्या असून त्या दृष्टीने पोलिसांकडून तपास केला जात असून पुढील कारवाई काय समोर येतं हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.