Nashik : Video : 22 पर्यटकांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढताना थरार समोर! दुगारवाडीत अडकलेले 22 जण बालंबाल बचावले

| Updated on: Aug 10, 2022 | 1:33 PM

त्यावेळी तिथं स्थानिकांच्या मदतीने पाच जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले, तर 12 जणांचा ग्रुप सायंकाळी 7.30 वाजल्यापासून नाल्याच्या मधोमध अडकून पडला होता.

Nashik : Video : 22 पर्यटकांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढताना थरार समोर! दुगारवाडीत अडकलेले 22 जण बालंबाल बचावले
दुगारवडीमध्ये अडकलेल्या 22 पर्यटकांना मध्यरात्री बाहेर काढलं, एकाचा मृत्यू
Image Credit source: tv9marathi
Follow us on

नाशिक : नाशिक (Nashik) मधील त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) तालुक्यातील दुगारवडीमध्ये (Dugarwadi waterfall) अडकलेल्या पर्यटकांच्या रेस्क्यू ऑपरेशनचे थरारक व्हिडिओ सध्या चांगलेचं व्हायरल झाले आहेत. कारण अचानक पाऊस वाढल्या 22 जणांच्या टीम दोन ठिकणी अडकली होती. तसेच तिथं मोबाईलला रेंज नसल्याने प्रशासनाशी त्याचा संपर्क झाला नाही. मध्यरात्री 22 पर्यटकांना रेस्क्यू करण्यात आल होतं. मुसळधार पाऊस आणि वेगाने वाहणाऱ्या पाण्यातून जीवाची बाजी लावून पर्यटकांना करण्यात बाहेर काढण्यातं आलं. स्थानिक ग्रामस्थ, स्थानिक ट्रेकर्स आणि पोलिसांच्या मदतीने मध्यरात्री ही मोहीम राबविण्यात आली. अचानक मुसळधार पाऊस सुरु झाल्याने 22 पर्यटक अडकले होते.

मृतदेह नाल्यातील धबधब्याच्या ठिकाणाहून ३ किमी खाली सापडला

नाशिक शहरापासून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात असलेल्या महाराष्ट्रातील सर्वात मनमोहक धबधब्यांपैकी एक असलेल्या दुगरवाडी धबधब्यावर एकाचा बुडून मृत्यू झाला. त्र्यंबकेश्वरचे पोलीस निरीक्षक संदिप रणदिवे यांनी ही माहिती सांगितली आहे. सोमवारी सकाळी एकाचा मृतदेह नाल्यातील धबधब्याच्या ठिकाणाहून ३ किमी खाली सापडला आहे. अविनाश गरूड असे मृताचे नाव असून, तो अंबेजोगाई इथला रहिवासी आहे. तो सध्या कामानिमित्त नाशिक शहरात राहतो. रविवारी संध्याकाळपासून धबधब्यावर अडकलेल्या इतर 22 पर्यटकांसोबत तो होता.नाशिक, ठाणे, बीड आणि जयपूर (राजस्थान) येथील पर्यटक धबधब्याला गेले होते आणि धबधब्याच्या तळघरात पोहोचण्यासाठी ते खाली उतरले. दुपारी 3.30 नंतर धबधब्याच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने नाल्यातील पाण्याची पातळी अचानक वाढली आणि हे लोक अडकले.

हे सुद्धा वाचा

मोबाईलला रेंज नसल्याने माहिती उशिरा समजली

त्यावेळी तिथं स्थानिकांच्या मदतीने पाच जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले, तर 12 जणांचा ग्रुप सायंकाळी 7.30 वाजल्यापासून नाल्याच्या मधोमध अडकून पडला होता. पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने त्यांना बाहेर काढण्यास अनेक अडचणी येत होत्या. नाल्याच्या पलीकडे पाच जणांचा ग्रुप देखील अडकला होता. त्या परिसरात मोबाईलची रेंज नसल्यामुळे पर्यटक अडकल्याची माहिती अत्यंत उशिरा समजली. त्यावेळी तहसिलदारांनी एका बजाव पथकाला ही माहिती दिली. रात्री उशिरा पर्यंत तरूणांना बाहेर काढण्याचे काम सुरु होते अशी माहिती मिळाली आहे.