AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पैशांसाठी नाही, ‘या’ कारणासाठी पाकिस्तानात दहशतवादी प्रशिक्षण, अटकेतील संशयितांचा खळबळजनक खुलासा

सण-उत्सवांचा कालावधी त्यांच्या निशाण्यावर होता. अटक केलेल्या संशयित दहशतवाद्यांनी सांगितले, की गर्दी असलेल्या प्रत्येक भागात हल्ला करण्याचे त्यांचे लक्ष्य होते. त्यांनी या संदर्भात अनेक ठिकाणी रेकी केली होती, तर अनेक ठिकाणी त्यांना रेकी करणं बाकी होतं.

पैशांसाठी नाही, 'या' कारणासाठी पाकिस्तानात दहशतवादी प्रशिक्षण, अटकेतील संशयितांचा खळबळजनक खुलासा
पाकिस्तानात दहशतवाद्यांना प्रशिक्षण
| Edited By: Anish Bendre | Updated on: Sep 15, 2021 | 3:05 PM
Share

नवी दिल्ली : बंगाली भाषेत बोलणारे आणि पाकिस्तानातून प्रशिक्षण घेऊन परत आलेले 16 जण पश्चिम बंगालमध्ये लपले असू शकतात, असा दावा दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने पकडलेल्या संशयित दहशतवाद्यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आम्हाला पैशांचा लोभ नाही, फक्त जिहादसाठी आम्ही पाकिस्तानला प्रशिक्षण घेण्यासाठी गेलो होतो, असं दहशतवाद्यांनी सांगितल्याची माहिती आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी मॉड्यूलचा (Pakistan-organised module) भांडाफोड करत मंगळवारी सहा जणांना अटक केली.

देशात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा मोठा कट दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने उधळून लावला आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याची योजना असल्याचं समोर आलं आहे.

उत्सवांचा कालावधी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर

सण-उत्सवांचा कालावधी त्यांच्या निशाण्यावर होता. अटक केलेल्या संशयित दहशतवाद्यांनी सांगितले, की गर्दी असलेल्या प्रत्येक भागात हल्ला करण्याचे त्यांचे लक्ष्य होते. त्यांनी या संदर्भात अनेक ठिकाणी रेकी केली होती, तर अनेक ठिकाणी त्यांना रेकी करणं बाकी होतं. यामध्ये मुंबईतील वर्दळीची ठिकाणं, लोकल ट्रेन, मोठी मंदिरे, तसेच उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमधील मोठ्या मैदानाचा समावेश असल्याचं बोललं जातं. गणेशोत्सव, नवरात्री, दसरा, रामलीला आणि निवडणूक सभा होणाऱ्या मोठ्या मैदानांचा यात समावेश आहे.

47 वर्षीय समीर कालिया उर्फ जान मोहम्मद शेख (Jan Mohammad Shaikh) याने गणपती विसर्जनासाठी महत्त्वाचे ठिकाण असलेल्या दक्षिण मुंबईतील गिरगाव चौपाटी, मरिन ड्राईव्ह परिसराची रेकी केली होती. तसेच अनेक वेळा त्याने मुंबईतील उपनगरीय रेल्वे स्थानकांची तपासणीही केली होती, अशी माहिती दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) सूत्रांनी दिली. तो सायन पश्चिमेकडील एमजी रोडवर असणाऱ्या कालाबखर परिसरात वास्तव्यास होता.

तिकीट बुकिंग एजंटचीही चौकशी

दरम्यान, अझगर नावाच्या तिकीट बुकिंग एजंटने 13 सप्टेंबर रोजी मुंबई सेंट्रल ते दिल्ली प्रवासाकरीता जान मोहम्मदसाठी तिकीट बुक केले होते. एजंट शेखला ओळखतो आणि त्याच भागात राहतो. त्याला धारावी पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

शेखच्या कुटुंबीयांचीही चौकशी

जान मोहम्मदला पत्नी आणि दोन मुली आहेत. मुंबई पोलिसांनी त्यांचीही धारावी पोलीस स्टेशनमध्ये नेऊन चौकशी केली. “जान मोहम्मदने काही दिवस ड्रायव्हर म्हणून काम केले, त्यानंतर त्याने कुरिअर बॉय म्हणून काम करण्यास सुरुवात केली. जान सोमवारी संध्याकाळपर्यंत मुंबईत होता. अचानक घरी आला आणि त्याने आपल्याला सांगितलं, की तो काही मित्रांसह उत्तर प्रदेशला जात आहे” अशी माहिती त्याच्या पत्नीने पोलिसांना दिली.

पत्नीला याबाबत संशय आल्यावर त्याने मोबाईलमध्ये तिकीट दाखवले. मात्र पत्नी आणखी काही विचारण्याआधी त्याने घाईघाईने कपडे बॅगेमध्ये भरले आणि संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास तो घरातून बाहेर पडला, अशी माहिती जान मोहम्मदच्या पत्नीने दिल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.

मित्र परिवाराला धक्का

जान मोहम्मद शेखचे मित्र असलेले फय्याज हुसैन यांनी सांगितले की, मी त्याला लहानपणापासून ओळखतो. त्याला 12 सप्टेंबरला शेवटचं भेटलो होतो. आम्ही एकत्र चहाही प्यायलो, तो ड्रायव्हर म्हणून काम करतो, जेव्हा आम्हाला त्याच्याबद्दल माहिती मिळाली, तेव्हा आम्हाला धक्का बसला, अशी प्रतिक्रिया हुसैन यांनी दिली.

दिल्ली पोलिसांकडून मित्राचीही चौकशी

फय्याज यांनी सांगितलं की त्यांना दिल्ली पोलिसांकडून फोन आला होता. दिल्ली पोलिसांनी जान मोहम्मदविषयी चौकशी केली आणि फय्याजबद्दलही पूर्ण माहिती घेतली. 13 तारखेला जान मोहम्मदने आपल्याला फोन केला होता, पण दोघेही बोलू शकले नव्हते, असंही फय्याज यांनी सांगितलं.

दिल्लीला निघताना शेख ताब्यात

जान मोहम्मद शेख कोटा येथून दिल्लीच्या दिशेने जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. जान मोहम्मद शेख हा कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिम याच्याही संपर्कात होता, अशी माहिती मिळत आहे. सहा संशयितांना पाकिस्तानातून प्रशिक्षण मिळत असल्याची माहिती आहे. देशभर सण-उत्सवांची धामधूम सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी गर्दी वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर बॉम्बस्फोट घडवून खळबळ उडवून देण्याची दहशतवादी योजना असल्याचं समोर आलं आहे.

दहशतवाद्यांनी काय सांगितलं?

पाकिस्तानमध्ये प्रशिक्षणासाठी गेलेल्या दोन दहशतवाद्यांना ज्या फार्म हाऊसमध्ये ठेवण्यात आले होते, तिथे पाकिस्तानी लष्करातील व्यक्तींनी बनावट नावे आणि बनावट हुद्दे वापरले होते. मात्र ज्या व्यक्तीने दोन्ही दहशतवाद्यांना फार्म हाऊसवर नेले तोच साध्या गणवेशातील खरा लष्करी अधिकारी होता, असं समोर आलं आहे.

साध्या गणवेशातील व्यक्तीलाच सलाम

फार्म हाऊसमध्ये फक्त साध्या गणवेशातील व्यक्तीलाच सलाम केला जात होता. पाकिस्तानी लष्कराच्या गणवेशात ज्या व्यक्ती होत्या, त्या ISI मध्ये अत्यंत कनिष्ठ पदावर होत्या, त्यामुळे गणवेशात असूनही कोणीही त्यांना सलाम करत नव्हते, असा खुलासा दोन्ही दहशतवाद्यांनी चौकशीत केला.

दहशतवाद्यांना कोणकोणतं प्रशिक्षण?

प्रशिक्षणादरम्यान एके 47 (Ak 47) तसेच चायनीज पिस्तूल सुरु आणि बंद करणे, चालवणे, IED बनवणे, ते प्लांट करणे, या गोष्टी शिकवल्याचं दहशतवाद्यांनी सांगितलं. रेकी किंवा बॉम्ब प्लांट करताना जर कोणाला तुमच्यावर संशय आला, तर कसे त्याला लहान शस्त्राने जखमी करुन घटनास्थळावरून पळून जायचे, संधी मिळाल्यावर शस्त्राशिवाय टार्गेटला कसे मारायचे, गर्दीने गजबजलेल्या बाजारपेठेत जर कोणी तुमचा पाठलाग करत असेल, तर रेस्टॉरंट-हॉटेलमध्ये अचानक कसे लपायचे? याचे प्रशिक्षण दिल्याचंही दहशतवाद्यांनी सांगितलं.

16 जण पश्चिम बंगालमध्ये?

बंगाली भाषेत बोलणारे आणि पाकिस्तानातून प्रशिक्षण घेऊन परत आलेले 16 जण पश्चिम बंगालमध्ये लपले असतील, असा दावाही त्यांनी केला. आम्हाला पैशांचा लोभ नाही, फक्त जिहादसाठी आम्ही पाकिस्तानला प्रशिक्षण घेण्यासाठी गेलो होतो, असं दहशतवाद्यांचं म्हणणं आहे.

संबंधित बातम्या :

मित्रांसोबत यूपीला जातो म्हणताच पत्नीला आलेला संशय, संशयित दहशतवादी जान मोहम्मदने कुटुंबीयांना काय काय सांगितलं?

Ak 47 कशी चालवायची, पाठलागापासून कसे वाचायचे? संशयित दहशतवाद्यांना पाकिस्तानात कोणकोणते प्रशिक्षण?

जान मोहम्मदला लहानपणापासून ओळखतो, परवाच एकत्र चहा झाला, संशयित दहशतवाद्याच्या अटकेनंतर मित्रांना धक्का

संशयित दहशतवादी जान मोहम्मदकडून गिरगाव चौपाटीची रेकी, मुंबई लोकलचीही पाहणी : सूत्र

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ