मित्रांसोबत यूपीला जातो म्हणताच पत्नीला आलेला संशय, संशयित दहशतवादी जान मोहम्मदने कुटुंबीयांना काय काय सांगितलं?

जान मोहम्मद शेख कोटा येथून दिल्लीच्या दिशेने जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. जान मोहम्मद शेख हा कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिम याच्याही संपर्कात होता, अशी माहिती मिळत आहे. सहा संशयितांना पाकिस्तानातून प्रशिक्षण मिळत असल्याची माहिती आहे.

मित्रांसोबत यूपीला जातो म्हणताच पत्नीला आलेला संशय, संशयित दहशतवादी जान मोहम्मदने कुटुंबीयांना काय काय सांगितलं?
Jan Mohammed Ali Shaikh
Follow us
| Updated on: Sep 15, 2021 | 1:11 PM

नवी दिल्ली : देशात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा मोठा कट दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने उधळून लावला आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याची योजना असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी सहा संशयित दहशतवाद्यांना अटक केली असून त्यापैकी एक मुंबईच्या धारावी परिसरातील रहिवासी आहे. समीर कालिया उर्फ जान मोहम्मद शेख (Jan Mohammad Shaikh) याला राजस्थानच्या कोटामधून ताब्यात घेण्यात आलं असून तो सायन पश्चिमेकडील एमजी रोडवर असणाऱ्या कालाबखर परिसरात वास्तव्यास होता. जान मोहम्मद शेखच्या कुटुंबीयांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं असता त्याच्या पत्नीने पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली.

शेखच्या कुटुंबीयांचीही चौकशी

जान मोहम्मदला पत्नी आणि दोन मुली आहेत. मुंबई पोलिसांनी त्यांचीही धारावी पोलीस स्टेशनमध्ये नेऊन चौकशी केली. “जान मोहम्मदने काही दिवस ड्रायव्हर म्हणून काम केले, त्यानंतर त्याने कुरिअर बॉय म्हणून काम करण्यास सुरुवात केली. जान सोमवारी संध्याकाळपर्यंत मुंबईत होता. अचानक घरी आला आणि त्याने आपल्याला सांगितलं, की तो काही मित्रांसह उत्तर प्रदेशला जात आहे” अशी माहिती त्याच्या पत्नीने पोलिसांना दिली.

पत्नीला याबाबत संशय आल्यावर त्याने मोबाईलमध्ये तिकीट दाखवले. मात्र पत्नी आणखी काही विचारण्याआधी त्याने घाईघाईने कपडे बॅगेमध्ये भरले आणि संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास तो घरातून बाहेर पडला, अशी माहिती जान मोहम्मदच्या पत्नीने दिल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.

मित्र परिवाराला धक्का

जान मोहम्मद शेखचे मित्र असलेले फय्याज हुसैन यांनी सांगितले की, मी त्याला लहानपणापासून ओळखतो. त्याला 12 सप्टेंबरला शेवटचं भेटलो होतो. आम्ही एकत्र चहाही प्यायलो, तो ड्रायव्हर म्हणून काम करतो, जेव्हा आम्हाला त्याच्याबद्दल माहिती मिळाली, तेव्हा आम्हाला धक्का बसला, अशी प्रतिक्रिया हुसैन यांनी दिली.

दिल्ली पोलिसांकडून मित्राचीही चौकशी

फय्याज यांनी सांगितलं की त्यांना दिल्ली पोलिसांकडून फोन आला होता. दिल्ली पोलिसांनी जान मोहम्मदविषयी चौकशी केली आणि फय्याजबद्दलही पूर्ण माहिती घेतली. 13 तारखेला जान मोहम्मदने आपल्याला फोन केला होता, पण दोघेही बोलू शकले नव्हते, असंही फय्याज यांनी सांगितलं.

दिल्लीला निघताना शेख ताब्यात

जान मोहम्मद शेख कोटा येथून दिल्लीच्या दिशेने जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. जान मोहम्मद शेख हा कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिम याच्याही संपर्कात होता, अशी माहिती मिळत आहे. सहा संशयितांना पाकिस्तानातून प्रशिक्षण मिळत असल्याची माहिती आहे. देशभर सण-उत्सवांची धामधूम सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी गर्दी वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर बॉम्बस्फोट घडवून खळबळ उडवून देण्याची दहशतवादी योजना असल्याचं समोर आलं आहे.

दहशतवाद्यांनी काय सांगितलं?

पाकिस्तानमध्ये प्रशिक्षणासाठी गेलेल्या दोन दहशतवाद्यांना ज्या फार्म हाऊसमध्ये ठेवण्यात आले होते, तिथे पाकिस्तानी लष्करातील व्यक्तींनी बनावट नावे आणि बनावट हुद्दे वापरले होते. मात्र ज्या व्यक्तीने दोन्ही दहशतवाद्यांना फार्म हाऊसवर नेले तोच साध्या गणवेशातील खरा लष्करी अधिकारी होता, असं समोर आलं आहे.

साध्या गणवेशातील व्यक्तीलाच सलाम

फार्म हाऊसमध्ये फक्त साध्या गणवेशातील व्यक्तीलाच सलाम केला जात होता. पाकिस्तानी लष्कराच्या गणवेशात ज्या व्यक्ती होत्या, त्या ISI मध्ये अत्यंत कनिष्ठ पदावर होत्या, त्यामुळे गणवेशात असूनही कोणीही त्यांना सलाम करत नव्हते, असा खुलासा दोन्ही दहशतवाद्यांनी चौकशीत केला.

दहशतवाद्यांना कोणकोणतं प्रशिक्षण?

प्रशिक्षणादरम्यान एके 47 (Ak 47) तसेच चायनीज पिस्तूल सुरु आणि बंद करणे, चालवणे, IED बनवणे, ते प्लांट करणे, या गोष्टी शिकवल्याचं दहशतवाद्यांनी सांगितलं. रेकी किंवा बॉम्ब प्लांट करताना जर कोणाला तुमच्यावर संशय आला, तर कसे त्याला लहान शस्त्राने जखमी करुन घटनास्थळावरून पळून जायचे, संधी मिळाल्यावर शस्त्राशिवाय टार्गेटला कसे मारायचे, गर्दीने गजबजलेल्या बाजारपेठेत जर कोणी तुमचा पाठलाग करत असेल, तर रेस्टॉरंट-हॉटेलमध्ये अचानक कसे लपायचे? याचे प्रशिक्षण दिल्याचंही दहशतवाद्यांनी सांगितलं.

16 जण पश्चिम बंगालमध्ये?

बंगाली भाषेत बोलणारे आणि पाकिस्तानातून प्रशिक्षण घेऊन परत आलेले 16 जण पश्चिम बंगालमध्ये लपले असतील, असा दावाही त्यांनी केला. आम्हाला पैशांचा लोभ नाही, फक्त जिहादसाठी आम्ही पाकिस्तानला प्रशिक्षण घेण्यासाठी गेलो होतो, असं दहशतवाद्यांचं म्हणणं आहे.

संबंधित बातम्या :

Ak 47 कशी चालवायची, पाठलागापासून कसे वाचायचे? संशयित दहशतवाद्यांना पाकिस्तानात कोणकोणते प्रशिक्षण?

जान मोहम्मदला लहानपणापासून ओळखतो, परवाच एकत्र चहा झाला, संशयित दहशतवाद्याच्या अटकेनंतर मित्रांना धक्का

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.