AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ak 47 कशी चालवायची, पाठलागापासून कसे वाचायचे? संशयित दहशतवाद्यांना पाकिस्तानात कोणकोणते प्रशिक्षण?

पाकिस्तानमध्ये प्रशिक्षणासाठी गेलेल्या दोन दहशतवाद्यांना ज्या फार्म हाऊसमध्ये ठेवण्यात आले होते, तिथे पाकिस्तानी लष्करातील व्यक्तींनी बनावट नावे आणि बनावट हुद्दे वापरले होते. मात्र ज्या व्यक्तीने दोन्ही दहशतवाद्यांना फार्म हाऊसवर नेले तोच साध्या गणवेशातील खरा लष्करी अधिकारी होता, असं समोर आलं आहे.

Ak 47 कशी चालवायची, पाठलागापासून कसे वाचायचे? संशयित दहशतवाद्यांना पाकिस्तानात कोणकोणते प्रशिक्षण?
पाकिस्तानात दहशतवाद्यांना प्रशिक्षण
| Updated on: Sep 15, 2021 | 11:11 AM
Share

नवी दिल्ली : देशात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा मोठा कट दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने उधळून लावला आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याची योजना असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी सहा संशयित दहशतवाद्यांना अटक केली असून त्यापैकी एक मुंबईच्या धारावी परिसरातील रहिवासी आहे. संशयित दहशतवाद्यांकडून महत्त्वाची माहिती समोर आल्याचं दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकातील सूत्रांनी सांगितलं आहे.

दहशतवाद्यांनी काय सांगितलं?

पाकिस्तानमध्ये प्रशिक्षणासाठी गेलेल्या दोन दहशतवाद्यांना ज्या फार्म हाऊसमध्ये ठेवण्यात आले होते, तिथे पाकिस्तानी लष्करातील व्यक्तींनी बनावट नावे आणि बनावट हुद्दे वापरले होते. मात्र ज्या व्यक्तीने दोन्ही दहशतवाद्यांना फार्म हाऊसवर नेले तोच साध्या गणवेशातील खरा लष्करी अधिकारी होता, असं समोर आलं आहे.

साध्या गणवेशातील व्यक्तीलाच सलाम

फार्म हाऊसमध्ये फक्त साध्या गणवेशातील व्यक्तीलाच सलाम केला जात होता. पाकिस्तानी लष्कराच्या गणवेशात ज्या व्यक्ती होत्या, त्या ISI मध्ये अत्यंत कनिष्ठ पदावर होत्या, त्यामुळे गणवेशात असूनही कोणीही त्यांना सलाम करत नव्हते, असा खुलासा दोन्ही दहशतवाद्यांनी चौकशीत केला.

दहशतवाद्यांना कोणकोणतं प्रशिक्षण?

प्रशिक्षणादरम्यान एके 47 (Ak 47) तसेच चायनीज पिस्तूल सुरु आणि बंद करणे, चालवणे, IED बनवणे, ते प्लांट करणे, या गोष्टी शिकवल्याचं दहशतवाद्यांनी सांगितलं. रेकी किंवा बॉम्ब प्लांट करताना जर कोणाला तुमच्यावर संशय आला, तर कसे त्याला लहान शस्त्राने जखमी करुन घटनास्थळावरून पळून जायचे, संधी मिळाल्यावर शस्त्राशिवाय टार्गेटला कसे मारायचे, गर्दीने गजबजलेल्या बाजारपेठेत जर कोणी तुमचा पाठलाग करत असेल, तर रेस्टॉरंट-हॉटेलमध्ये अचानक कसे लपायचे? याचे प्रशिक्षण दिल्याचंही दहशतवाद्यांनी सांगितलं.

16 जण पश्चिम बंगालमध्ये?

बंगाली भाषेत बोलणारे आणि पाकिस्तानातून प्रशिक्षण घेऊन परत आलेले 16 जण पश्चिम बंगालमध्ये लपले असतील, असा दावाही त्यांनी केला. आम्हाला पैशांचा लोभ नाही, फक्त जिहादसाठी आम्ही पाकिस्तानला प्रशिक्षण घेण्यासाठी गेलो होतो, असं दहशतवाद्यांचं म्हणणं आहे.

दरम्यान, मुंबईत राहणाऱ्या समीर कालिया उर्फ जान मोहम्मद शेख (Jan Mohammad Shaikh) याला राजस्थानच्या कोटामधून ताब्यात घेण्यात आलं आहे. तो सायन पश्चिमेकडील एमजी रोडवर असणाऱ्या कालाबखर परिसरात वास्तव्यास होता.

मित्र परिवाराला धक्का

जान मोहम्मद शेखचे मित्र असलेले फय्याज हुसैन यांनी सांगितले की, मी त्याला लहानपणापासून ओळखतो. त्याला 12 सप्टेंबरला शेवटचं भेटलो होतो. आम्ही एकत्र चहाही प्यायलो, तो ड्रायव्हर म्हणून काम करतो, जेव्हा आम्हाला त्याच्याबद्दल माहिती मिळाली, तेव्हा आम्हाला धक्का बसला, अशी प्रतिक्रिया हुसैन यांनी दिली.

दिल्ली पोलिसांकडून मित्राचीही चौकशी

फय्याज यांनी सांगितलं की त्यांना दिल्ली पोलिसांकडून फोन आला होता. दिल्ली पोलिसांनी जान मोहम्मदविषयी चौकशी केली आणि फय्याजबद्दलही पूर्ण माहिती घेतली. 13 तारखेला जान मोहम्मदने आपल्याला फोन केला होता, पण दोघेही बोलू शकले नव्हते, असंही फय्याज यांनी सांगितलं.

शेखच्या कुटुंबीयांचीही चौकशी

जान मोहम्मदला पत्नी आणि दोन मुली आहेत. त्यांनाही सध्या मुंबई पोलिसांनी धारावी पोलीस स्टेशनमध्ये नेले असून त्यांची चौकशी केली जात आहे. धारावी पोलीस ठाण्यासमोर स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

दिल्लीला निघताना शेख ताब्यात

जान मोहम्मद शेख कोटा येथून दिल्लीच्या दिशेने जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. जान मोहम्मद शेख हा कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिम याच्याही संपर्कात होता, अशी माहिती मिळत आहे. सहा संशयितांना पाकिस्तानातून प्रशिक्षण मिळत असल्याची माहिती आहे. देशभर सण-उत्सवांची धामधूम सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी गर्दी वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर बॉम्बस्फोट घडवून खळबळ उडवून देण्याची दहशतवादी योजना असल्याचं समोर आलं आहे.

संबंधित बातम्या :

जान मोहम्मदला लहानपणापासून ओळखतो, परवाच एकत्र चहा झाला, संशयित दहशतवाद्याच्या अटकेनंतर मित्रांना धक्का

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.