Video : 11 वर्षांच्या मुलावर पिटबुलचा जीवघेणा हल्ला , निर्लज्जपणे हसत राहिला मालक

मुंबईतील मानखुर्द परिसरात एका पिटबुल कुत्र्याने एका छोट्या मुलावर अटॅक कतर त्याला जखमी केले. या घटनेचा एक भयानक व्हिडिओ समोर आला आहे जिथे लोकं त्या मुलाची मदत करण्याऐवजी तमाशा पाहत होते. आणखी धक्कादायक गोष्ट म्हणजे तो मुलाग रडत असताना, मदतीची याचना करत असताना त्या कुत्र्याचा मालक मात्र हे पाहून निर्लज्जपणे हसत होता.

Video : 11 वर्षांच्या मुलावर पिटबुलचा जीवघेणा हल्ला , निर्लज्जपणे हसत राहिला मालक
पिटबुलचा लहान मुलावर हल्ला
Image Credit source: social media
| Updated on: Jul 21, 2025 | 11:20 AM

मुंबईतील मानखुर्द पोलीस स्टेशन परिसरातील पीएमजीपी म्हाडा कॉलनीतून एक अतिशय धक्कादायक आणि हादरवणारी घटना समोर आली आहे. त्या परिसरात एका रिक्षात खेळणाऱ्या लहान मुलावर पिटबुल कुत्र्याने हल्ला केला आणि त्याचा चावून जखमी केले. विशेष म्हणजे आजूबाजूचे लोकं हे पाहून या गोष्टीची मजा घेत होते,व्हिडीओ शूट करत होते. तर त्या रिक्षातच बसलेला पिटबुल कुत्र्याचा मालक मात्र हे सगळम पाहून निर्लज्जपणे हसत राहिला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी कुत्र्याच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करत तपासही सुरू केला आहे. या घटनेत जखमी झालेल्या पीडित मुलाच्या कुटुंबियांनी मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याचा आरोप लावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचा अल्पवयीन मुलगा हमझा, हा 17 जुलै 2025 रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास बिल्डिंग नंबर 91 ए च्या समोर उभ्या असलेल्या रिक्षात खेळत होता. त्याच वेळी त्याच परिसरात राहणारा मोहम्मद सोहेल हसन खान याने त्याचा पाळीव, पिटबूल कुत्र्याची लीश काढून त्याला मोकळं सोडलं. तो कुत्रा रिक्षात शिरला आणि त्याच्या मागे त्याचा मालकही रिक्षात बसला. त्यानंतर त्या पिटबुलने रिक्षात खेळणाऱ्या हमझावर हल्ला केला आणि त्याला चावला. या हल्ल्यामुळे अतिशय घाबरलेला हमझा रडू लागला आणि मदतीसाठी याचना करू लागला, तो गयावया करत होता. मात्र हे सगळं पाहून त्या कुत्र्याचा मालक असलेल्या हम्मद सोहेल हसन खान याला जराही दया आली नाही. उलटं तो हा सगळा प्रकार एन्जॉय करत होता, आणि हसतही होता.

काही सेकंदांनंतर तो मुलगा जोरजोरात ओरडू लागला आणि त्या पिटबुलने त्याच्या हनुवटीचा चावा घेतला तरीही कोणीही त्याच्या मदतीसाठी आलं नाही. अखेर तो मुलगा कसाबसा खाली उतरला आणि घराच्या दिशेने धावत सुटला. मात्र लीश काढून मोकळ सोडल्यामुळे तो पिटबुलही त्याच्या मागे धावत होता. सगळ्यात अजब गोष्ट म्हणजे अवघ्या 11 वर्षांच्या मुलाचे हे हाल पाहून कोणालाच दया आली नाही,आजूबाजूचे लोक चक्क या घटनेची मजा घेत होते, हसत हसत कॉमेंट्स करत व्हिडीओ शूटिंगही करत होते.

पोलिसांनी नोटीस देऊन पिटबुलच्या मालकाला सोडून दिलं

यानंतर, भेदरेलालतो मुलगा रडत त्याच्या घरी पोहोचला, त्याची हालत पाहून घरेचही हादरले. दुसऱ्या दिवशी, 18 रोजी, त्याचे कुटुंबीय, आपल्या मुलाला घेऊन पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. येथे त्यांनी आरोपी मोहम्मद सोहेल हसन खान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र आरोपी मोहम्मद सोहेल खानला बीएनएसच्या कलम 35(3) अंतर्गत नोटीस बजावल्यानंतर पोलिसांनी सोडून दिले आणि अटक करण्यात आली नाही असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे . दरम्यान, पोलिसांनी त्या कुत्र्याच्या मालकाविरुद्ध भारतीय दंड संहिता (BNS) च्या कलम 291, 125 आणि 125(A) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पिटबुलचा मुलावर हल्ला

या अत्यंत दुर्दैवी आणि हादरवणाऱ्या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. त्यामध्ये पिटबुलसारखा धोकादायक कुत्रा एका अल्पवयीन मुलावर क्रूरपणे हल्ला करताना दिसतोय. आणि घाबरलेल्या त्या मुलाला मदत करण्याऐवजी काही लोक हसताना आणि विनोद करताना दिसत आहेत. या घटनेने मानवतेवर प्रश्नचिन्ह उभ करता सर्वांनाच हादरवून टाकले आहे. पीडित हमजा (वय 11) म्हणाला की आम्ही बसून बोलत होतो तेव्हा माझ्या एका मित्राने ओरडून विचारलं की, ‘तुम्ही पिटबुल घेऊन कुठे जात आहात?’ आम्ही पुन्हा पाहिले तेव्हा तो कुत्रा घेऊन येत होता.

 

पळत पळत वाचवला जीव

ते पाहून सगळेच तिथून पळून गेले पण मी मात्र अडकलो होतो. तू तुझा त्याचा जीव कसा वाचवला आणि कुत्र्याला सोडून देणाऱ्या व्यक्तीला थांबवण्याचा प्रयत्न केला का, असं त्याला विचारण्यात आलं. तेव्हा त्याने सांगितले की मी कुत्र्याला सोडून देणाऱ्या व्यक्तीला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो त्याला तसाच सोडून गेला आणि हसत होता. त्या कुत्र्याने माझ्यावर हल्ला केला, तो मला चावला देखील. मग मी तिथून कसाबसा पळालो. पण त्या कुत्र्याने माझा पाठलाग केला, त्याने माझे कपडेही पकडले होते. आजूबाजूचे लोक हे सगळं बघत होते, पण कोणीच माझ्या मदतीसाठी पुढे आलं नाही. या हादरवणाऱ्या घटनेमुळे हमझा खूपच घाबरलेला आहे. मला कुत्र्यांची खूपच भीती वाटते, असं त्याने सांगितलं.