AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्रीच्या अंधारात दबा धरुन बसले, पोलिसांनी केला सिनेस्टाईल पाठलाग, 3 दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या

पुणे-सोलापूर महामार्गावर दरोड्याच्या तयारीत असलेल्या 3 दरोडेखोरांना दौंड पोलिसांनी जेरबंद केलंय. तर रात्रीच्या अंधारात एकूण 4 दरोडेखोर पळूण जाण्यात यशस्वी ठरले आहेत.

रात्रीच्या अंधारात दबा धरुन बसले, पोलिसांनी केला सिनेस्टाईल पाठलाग, 3 दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या
pune daund crime
| Edited By: | Updated on: Aug 02, 2021 | 10:59 PM
Share

पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावर दरोड्याच्या तयारीत असलेल्या 3 दरोडेखोरांना दौंड पोलिसांनी जेरबंद केलंय. तर रात्रीच्या अंधारात एकूण 4 दरोडेखोर पळूण जाण्यात यशस्वी ठरले आहेत. अटक केलेल्या आरोपींचा दौंड पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग केला. मुसक्या आवळलेले सर्व दरोडेखोर उसामध्ये दबा धरून बसले होते. पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये तब्बल तीन तास थरार सुरु होता. (Daund Police arrested Four robbrs on Pune Solapur Highway)

पुलाजवळ आरोपी दरोडा टाकण्यासाठी लपले असल्याची माहिती मिळाली

मिळालेल्या माहितीनुसार पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दौंड तालुक्यातील खडकी गावच्या हद्दीत एकूण सात दरोडेखोर दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. त्यासाठीची सर्व तयारी त्यांनी केली होती. मात्र, खबऱ्यांच्या माध्यमातून पोलिसांना या दरोड्याची माहिती मिळाली. खडकी गावच्या हद्दीतील शितोळे वस्ती येथील पुलाजवळ आरोपी दरोडा टाकण्यासाठी लपले  होते. त्यानंतर दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दरोडेखोरांना पकडण्यासाठी सापळा रचला. पोलीस दिसताच सातही दरोडेखोरांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी यापैकी तीन दरोडेखारांना पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून जेरबंद केलं.

4 आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाले

रात्रीच्या अंधारात एकूण सात दरोडेखोर उसाच्या शेतामध्ये चिखलात दबा धरून बसले होते. या तीन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले. तर 4 आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाले. अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांची पोलीस कसून चौकशी करत आहेत. त्यांच्या चौकशीतून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या :

सावधान! व्हीआयपी मोबाईल नंबर मिळवून देण्याच्या नावाखाली लाखोंचा गंडा; मुंबईत गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश

धक्कादायक ! प्रेम, लग्न, परीक्षेचं कारण, देशात दोन वर्षात तब्बल 24,568 मुलामुलींची आत्महत्या, महाराष्ट्राचा आकडा मोठा

‘जिथे जाऊ तिथे खाऊ’, लाच घेताना हवालदाराला अटक, बारामती पोलीस दलात खळबळ

(Daund Police arrested Four robbrs on Pune Solapur Highway)

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.