AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | रस्त्यावर दोन-चार नोटा फेकल्या, बाईकस्वार आमिषाला भुलताच त्याचे सव्वादोन लाख उडवले

इंदापूर शहरातील हिरो मोटरसायकल शोरुमच्या जवळ असलेल्या रस्त्यावर अज्ञात व्यक्तींनी लबाडीच्या उद्देशाने दोन-चार नोटा टाकलेल्या होत्या. त्या उचलण्याच्या नादात फिर्यादी बाईकवरुन उतरला, आणि हीच संधी साधून त्याच्या बाईकच्या हँडलला अडकवलेली पैशांची पिशवी अज्ञात चोरांनी लंपास केली.

VIDEO | रस्त्यावर दोन-चार नोटा फेकल्या, बाईकस्वार आमिषाला भुलताच त्याचे सव्वादोन लाख उडवले
| Edited By: Anish Bendre | Updated on: Sep 17, 2021 | 11:24 AM
Share

इंदापूर : “आवळा देऊन कोहळा काढणे” या म्हणीचा प्रत्यय नुकताच पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये पहावयास मिळाला आहे. पैसे लुटण्याच्या इराद्याने चोरट्यांनी नामी शक्कल लढवल्याचं समोर आलं आहे. चोरट्यांनी चक्क रस्त्यावर दोन-चार नोटा फेकल्या होत्या. रस्त्यावर पडलेल्या या नोट उचलण्याच्या मोहापायी जे बाईकस्वार उतरायचे, त्यांच्या दुचाकीवरील ऐवज लुटून पसार होण्याचा त्यांचा प्लॅन होता. या योजनेनुसारच बाईकवरुन खाली उतरलेल्या एका दुचाकीस्वाराचे 2 लाख 33 हजार रुपये चोरीला गेल्याची घटना गुरुवारी दुपारी इंदापूर शहरात घडली आहे.

काय आहे प्रकरण?

पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेमधून दोन लाख तेहतीस हजार रुपये घेऊन फिर्यादी घराच्या दिशेने जात होता. यावेळी इंदापूर शहरातील हिरो मोटरसायकल शोरुमच्या जवळ असलेल्या रस्त्यावर अज्ञात व्यक्तींनी लबाडीच्या उद्देशाने दोन-चार नोटा टाकलेल्या होत्या. त्या उचलण्याच्या नादात फिर्यादी बाईकवरुन उतरला, आणि हीच संधी साधून त्याच्या बाईकच्या हँडलला अडकवलेली पैशांची पिशवी अज्ञात चोरांनी लंपास केली.

सीसीटीव्ही फूटेजमध्ये काय दिसतं?

या संदर्भात इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. विशेष बाब म्हणजे ही घटना पूर्णपणे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे. या दृश्यात असे दिसून येत आहे की अन्य दुचाकीवरील दोन आरोपी हे रस्त्यावरती दोन नोटा फेकत आहेत. त्यानंतर मागून येणारा दुचाकीस्वार रस्त्यालगतच त्याची दुचाकी थांबवून त्या नोटा उचलत आहे. ज्यांनी या नोटा रस्त्यावर टाकलेल्या होत्या, त्यांनीच नोटा उचलणाऱ्याच्या गाडीच्या हँडलवर लावलेले बॅग लंपास केलेली आहे. या चोरी प्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस अधिकारी पुढील तपास करत आहेत.

पाहा व्हिडीओ :

पुण्यात मोबाईल चोरांचा महिलेकडून पाठलाग

पादचारी महिलेचा मोबाईल आणि पर्स लुटून चोरांनी पळ काढल्याचा प्रकार गेल्याच महिन्यात पुण्यात उघडकीस आला होता. हडपसर भागात दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. महिलेने एक किलोमीटरपर्यंत चोरांचा पाठलागही केला, मात्र ते हाती लागले नव्हते.

काय घडलं होतं?

रस्त्यावर गाडीची वाट पाहत असलेल्या महिलेला दोघांनी लुटल्याची घटना पुण्यातील हडपसर भागातील यश रवी पार्क सोसायटीच्या समोर घडली होती. दिवसाढवळ्या महिलेच्या हातातील मोबाईलसह पर्सची चोरी करण्यात आली. दोघा चोरट्यांनी पर्स आणि मोबाईल हिसकावल्यानंतर महिलेने जवळपास 1 किलोमीटरपर्यंत चोरांचा पाठलागही केला, मात्र त्यांना पकडता आलं नाही. मात्र भामटे चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते.

संबंधित बातम्या :

CCTV VIDEO | पन्नाशीची पुणेकर महिला, चोऱ्यांसाठी मुंबईत, पोलिसांच्या जाळ्यात कशी सापडली?

मूकबधिर तरुणीवर बलात्कार करुन मोबाईल चोरी, कल्याण पोलिसांकडून आरोपीला गुजरातमध्ये अटक

स्टेशनवर हिसका देऊन मोबाईल पळवला, पाठलाग करुन महिलेने चोरट्याला पकडलं

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...