स्टेशनवर हिसका देऊन मोबाईल पळवला, पाठलाग करुन महिलेने चोरट्याला पकडलं

महिला शहाड रेल्वे स्थानकात थांबली होती. याच वेळी एक तरुण तिच्याजवळ आला. त्याने हातातील मोबाईल खेचण्याचा प्रयत्न केला, यावेळी महिलेने प्रतिकार केला, परंतु मोबाईल हिसकावून चोरट्याने पळ काढला.

स्टेशनवर हिसका देऊन मोबाईल पळवला, पाठलाग करुन महिलेने चोरट्याला पकडलं
कल्याण रेल्वे पोलिसांकडून मोबाईल चोर जेरबंद

कल्याण : झटापटीत महिलेचा मोबाईल हिसकावून पळणाऱ्या आरोपीला कल्याण जीआरपीने अटक केली आहे. विशेष म्हणजे या महिलेनेच नागरिकांच्या मदतीने आरोपीला पकडून कल्याण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले होते. मात्र महिलेचा मोबाईल अद्याप सापडलेला नाही. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

नेमकं काय घडलं?

मुंबईत काम करणारी एक महिला काही कामानिमित्त शहाड येथे आली होती. ती शहाड रेल्वे स्थानकात थांबली होती. याच वेळी एक तरुण तिच्याजवळ आला. त्याने या महिलेच्या हातातील मोबाईल खेचण्याचा प्रयत्न केला, यावेळी महिलेने प्रतिकार केला मात्र तिला हिसका देऊन मोबाईल हिसकावून चोरट्याने पळ काढला.

पाठलाग करत चोराला पकडले

या झटापटीत महिलेचे काही दागिने गायब झाले. महिलेने पाठलाग करत चोराला पकडले. याच दरम्यान एक पोलीस कर्मचारी आणि काही नागरिक त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी या चोरट्याला पकडले. शाहरुख गफूर शेख या चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना 14 ऑगस्ट रोजी घडली असून अद्याप मोबाईल आणि दागिने सापडलेले नाहीत.

मूकबधीर तरुणीवर बलात्कार करुन मोबाईल चोरी

दरम्यान, मूकबधीर तरुणीवर बलात्कार करुन, तिचा महागडा मोबाईल हिसकावून पसार झालेल्या आरोपीला कल्याण पोलिसांनी गुजरातहून अटक केल्याची घटना गेल्याच महिन्यात उघडकीस आली होती. मूकबधीर तरुणीवरील बलात्काराच्या घटनेमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली होती. पहाटेच्या सुमारास मूकबधीर तरुणीवर बलात्कार करुन तिचा मोबाईल हिसकावून आरोपी पसार झाला होता. मात्र कल्याण स्थानकात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात आरोपी कैद झाला होता.

संबंधित बातम्या :

मूकबधिर तरुणीवर बलात्कार करुन मोबाईल चोरी, कल्याण पोलिसांकडून आरोपीला गुजरातमध्ये अटक

कुरकुरे देण्याच्या बहाण्याने पुण्यात चिमुरडीवर बलात्कार, 30 वर्षीय बिहारी तरुणाला अटक

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI