AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुरकुरे देण्याच्या बहाण्याने पुण्यात चिमुरडीवर बलात्कार, 30 वर्षीय बिहारी तरुणाला अटक

चार वर्षांची पीडित बालिका घराजवळ खेळत असताना आरोपी मजुराने कुरकुरे खायला देण्याचा बहाणा करुन तिला जवळ बोलावलं. त्यानंतर चिमुरडीवर त्याने बलात्कार केल्याचा आरोप आहे.

कुरकुरे देण्याच्या बहाण्याने पुण्यात चिमुरडीवर बलात्कार, 30 वर्षीय बिहारी तरुणाला अटक
लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक छळ करणाऱ्या आरोपीला तेलंगणातून अटक
Reporter Ashwini Satav Doke
Reporter Ashwini Satav Doke | Edited By: Anish Bendre | Updated on: Jul 05, 2021 | 8:28 AM
Share

पुणे : चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. कुरकुरे खायला देण्याचा बहाणा करुन बिहारी मजुराने चिमुरडीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडितेच्या आईच्या तक्रारीनंतर 30 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे पुणे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Pune Loni Kalbhor 4 years old girl allegedly raped by Bihar labor)

मन्नूकुमार मनोज सिंग (वय 30, मूळ रा. बिहार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित कुटुंब पुण्यातील लोणी काळभोर परिसरात राहतं. तर मूळ बिहारचा असलेला 30 वर्षीय आरोपीही तिथेच मजुरी करतो. चार वर्षांची पीडित बालिका घराजवळ खेळत असताना आरोपी मजुराने कुरकुरे खायला देण्याचा बहाणा करुन तिला जवळ बोलावलं. त्यानंतर चिमुरडीवर त्याने बलात्कार केल्याचा आरोप आहे.

कशी उघडकीस आली घटना?

मुलगी रडत घरी आल्यानंतर आईने तिला कारण विचारलं. त्यावेळी तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. लोणी काळभोर पोलिसांनी तात्काळ आरोपीला बेड्या ठोकल्या. आरोपीनेही  गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याला सात जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पुण्यात बालिकेवरील बलात्काराची पुनरावृत्ती

पुण्याच्या विमाननगरमध्ये पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना काही महिन्यांपूर्वीही समोर आली होती. एका हॉटेलच्या सुरक्षारक्षकाने पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. पीडित चिमुरडी आपल्या आई-वडिलांसोबत एका लेबर कॅम्पमध्ये राहत होती. आई-वडील दोघेही कामावर गेल्यानंतर ती घरी एकटीच असते, हे आरोपीने हेरले होते. दुपारच्या सुमारास पाच वर्षांच्या चिमुरडीला तिच्या घरातून बाहेर बोलावत आरोपीने तिला आपण काम करत असलेल्या हॉटेल शेजारील एका चारचाकी शोरुमच्या पार्किंगमध्ये नेलं होतं, त्यानंतर तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप झाला होता.

संबंधित बातम्या :

जुन्या प्रेमावरुन वाद, रागाच्या भरात प्रियकराकडून चाकूने वार, महिलेची प्रकृती नाजूक

आई वडील कामावर, घरी एकटीच, आरोपीने हेरलं, पुण्यात पाच वर्षीय चिमुरडीवर नराधमाचा बलात्कार

(Pune Loni Kalbhor 4 years old girl allegedly raped by Bihar labor)

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...