मूकबधिर तरुणीवर बलात्कार करुन मोबाईल चोरी, कल्याण पोलिसांकडून आरोपीला गुजरातमध्ये अटक

पहाटेच्या सुमारास मूकबधीर तरुणीवर बलात्कार करुन आरोपी पसार झाला होता. मात्र कल्याण स्थानकात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात आरोपी कैद झाला होता.

मूकबधिर तरुणीवर बलात्कार करुन मोबाईल चोरी, कल्याण पोलिसांकडून आरोपीला गुजरातमध्ये अटक
मूकबधिर तरुणीवर बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक

कल्याण : मूकबधीर तरुणीवर बलात्कार करुन, तिचा महागडा मोबाईल हिसकावून पसार झालेल्या आरोपीला कल्याण पोलिसांनी गुजरातहून अटक केली आहे. अश्विन राठवा असे या नराधमाचे नाव असून कल्याण न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मूकबधीर तरुणीवरील बलात्काराच्या घटनेमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली होती. पोलिसांची 5 तपास पथके आरोपीच्या शोधात होती.

नेमकं काय घडलं?

पीडित तरुणी कल्याण पूर्व भागातील कोळसेवाडी परिसरात राहते. ती एका कुरिअर कंपनीच्या कार्यालयात काम करते. 2 जुलै रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास ती घरातून निघाली. तिच्या भावाने कल्याण पूर्व भागातील स्टेशन परिसरात तिला सोडले. त्यानंतर ती रस्त्याने पूर्व भागातून पश्चिमेला गेली. कल्याण पश्चिमेतील रेल्वे कॉलनीत पोहचली असता एका निजर्नस्थळी आरोपी तिचा पाठलाग करत होता.

बलात्कारानंतर मोबाईलसह पसार

साडेपाच वाजताच्या सुमारास आरोपीने तिला गाठले आणि तिच्यावर बलात्कार केला. तिचा मोबाईल हिसकावून तो पसार झाला.
तरुणी कशीबशी सुभाष चौकात पोहचली. ज्या ठिकाणी कामावर जाण्यासाठी तिला बस पकडायची होती, तिथे एका महिलेने तिला पाहिले. तिच्या सोबत काय घडले असावे, याची कल्पना तिला लगेच आली. तिने पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तातडीने या तरुणीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले.

सीसीटीव्हीमुळे आरोपी जाळ्यात

कल्याण स्थानकात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात आरोपी कैद झाला होता. हा आरोपी ठाणे सीसीटीव्हीतही दिसून आला. कल्याणचे महात्मा फुले पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक संभाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस आणि गुन्हे शाखा आरोपीचा शोध घेत होते. अखेर नऊ दिवसांनी आरोपीचा सुगावा लागला.

चार दिवसांची पोलिस कोठडी

महात्मा फुले पोलिसांनी आरोपीच्या एका मित्राला ताब्यात घेऊन त्याच्याकडून आरोपी कोण आहे, तो कुठे आहे याची माहिती घेतली. पोलिस अधिकारी दीपक सरोदे, पोलिस कर्मचारी सचिन भालेराव, सूचित टिकेकर, रविंद्र हासे यांचे तपास पथक गुजरातमधील अहमदाबाद येथे पोहचले. नराधम अश्विन राठवा याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून तरुणीचा मोबाईलही देखील हस्तगत केला आहे. आज कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास महिला पोलिस अधिकारी मंजूषा शेलार करीत आहेत.

संबंधित बातम्या :

कुरकुरे देण्याच्या बहाण्याने पुण्यात चिमुरडीवर बलात्कार, 30 वर्षीय बिहारी तरुणाला अटक

संतापजनक ! नवी मुंबईत सात वर्षाच्या चिमुकलीवर घराशेजारच्या नराधमाकडून बलात्कार

(Kalyan Deaf Girl Raped and Mobile Theft Accuse arrested from Gujarat)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI