Pune Suicide | अवघ्या दोन महिन्यांपूर्वी लग्न, पुण्यातील हॉटेलमध्ये नवविवाहितेचा गळफास

Pune Suicide | अवघ्या दोन महिन्यांपूर्वी लग्न, पुण्यातील हॉटेलमध्ये नवविवाहितेचा गळफास
पुण्यात नवविवाहित महिलेची आत्महत्या

दोन महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या एका महिलेने हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. रंगोली भास्करराव वडावराव असं आत्महत्या करणाऱ्या 32 वर्षीय तरुणीचं नाव आहे.

अश्विनी सातव डोके

| Edited By: अनिश बेंद्रे

Dec 14, 2021 | 7:51 AM

पुणे : नवविवाहित तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हॉटेलमध्ये गळफास घेऊन तिने आपल्या आयुष्याची अखेर केल्याचा आरोप आहे. पुण्यात सिंहगड रोड भागात हा प्रकार घडल्याची माहिती आहे. कौटुंबिक वादातून लग्नानंतर अवघ्या दोनच महिन्यात 32 वर्षीय तरुणीने टोकाचं पाऊल उचललं.

काय आहे प्रकरण?

दोन महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या एका महिलेने हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. रंगोली भास्करराव वडावराव असं आत्महत्या करणाऱ्या 32 वर्षीय तरुणीचं नाव आहे.

हॉटेलमध्ये पंख्याला गळफास

रंगोली पुण्यातील धानोरी भागातील रहिवासी होती. मात्र सिंहगड रस्ता परिसरातील एका हॉटेलमध्ये जाऊन महिलेने जीवनयात्रा संपवली. हॉटेलच्या रुममधील फॅनला गळफास घेऊन तिने आयुष्याची अखेर केली.

कौटुंबिक वादातून आत्महत्येची चर्चा

या प्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कौटुंबिक वादातून महिलेने आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. मात्र आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

संबंधित बातम्या :

कल्याणमधील हत्याकांड प्रकरणी मोठा खुलासा; मुलानेच केली वडिलांची हत्या

माथेरानमध्ये हत्या झालेल्या महिलेची ओळख पटली, चारित्र्याच्या संशयावरुन पतीनेच काढला पत्नीचा काटा

प्रेयसी बोलत नाही, हातावर ब्लेडचे वार करून प्रियकराची आत्महत्या, औरंगाबादेत प्रेयसीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें