AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वानवडी बलात्कार प्रकरण, अल्पवयीन पीडितेवर नऊ ठिकाणी अत्याचार, आरोपींकडून व्हिडीओ शूट

आरोपींना या गुन्ह्यात अजून कुणी मदत केली आहे का? अल्पवयीन मुलींना समज नसल्याचा फायदा घेऊन आणखी कोणत्या अल्पवयीन मुलींवर अत्याचार केले आहेत का? याचा तपास सुरु आहे.

वानवडी बलात्कार प्रकरण, अल्पवयीन पीडितेवर नऊ ठिकाणी अत्याचार, आरोपींकडून व्हिडीओ शूट
प्रातिनिधीक फोटो
Reporter Ashwini Satav Doke
Reporter Ashwini Satav Doke | Edited By: Anish Bendre | Updated on: Sep 17, 2021 | 3:16 PM
Share

पुणे : पुण्यातील वानवडी बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीवर केलेल्या अत्याचाराचे व्हिडीओ चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या तपासात समोर आला आहे. तब्बल नऊ ठिकाणी नेऊन आरोपींनी मुलीवर अत्याचार केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

आरोपींना या गुन्ह्यात अजून कुणी मदत केली आहे का? अल्पवयीन मुलींना समज नसल्याचा फायदा घेऊन आणखी कोणत्या अल्पवयीन मुलींवर अत्याचार केले आहेत का? याचा तपास सुरु आहे. आतापर्यंत या प्रकणात एकूण 17 आरोपींना अटक करण्यात आली असून यातील 14 जणांनी बलात्कार केल्याचे निष्पन्न झालं आहे.

पुणे रेल्वे स्थानक परिसरातून 13 वर्षीय मुलीचं अपहरण करुन रेल्वेतील दोन कर्मचारी आणि काही रिक्षा चालकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार 5 सप्टेंबरला उघडकीस आला होता. मात्र 13 वर्षीय पीडितेवर केवळ पुण्यातच नाही तर मुंबईजवळही अत्याचार झाल्याचे त्यानंतर समोर आले होते.

रॅकेटचा कसा उलगडा झाला?

वानवडी सामूहिक बलात्कार प्रकरणी सुरुवातीला आठ जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या रॅकेटचा पूर्ण उलगडा करत पोलिसांनी 7 सप्टेंबर रोजी आणखी पाच जणांना अटक केली होती. 13 वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्यांची संख्या तेव्हा तब्बल 13 इतकी झाली होती. तर बलात्कार झाल्याचे माहिती असूनही तिला पालकांकडे न सोपवता बिहारला नेणाऱ्या तिच्या मित्रालाही नंतर अटक करण्यात आली. नंतर पुणे पोलिसांनी दोन लॉज मॅनेजरला ताब्यात घेतलं होतं. तर वानवडी पोलीस करत असलेल्या तपासाचे धागेदोरे ठाण्यापर्यंत पोहोचल्यानंतर ठाण्यातून एका आरोपीला अटक करण्यात आली होती.

दोन रेल्वे कर्मचारी निलंबित

प्रशांत सॅमियल गायकवाड (टीएलअँडएसी, विद्युत विभाग, पुणे स्थानक) आणि राजकुमार रामनगिना प्रसाद (इलेक्ट्रिक आणि देखभाल, विद्युत विभाग, पुणे स्थानक) या अटकेतील कर्मचाऱ्यांना रेल्वेकडून निलंबित करण्यात आलं आहे.

नेमकं काय घडलं?

पीडित 13 वर्षीय मुलगी ही 31 ऑगस्टच्या रात्री गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर आली होती. यावेळी काही आरोपींना इतक्या रात्री तुला गाडी मिळणार नाही, असे सांगून रेल्वे स्थानकाबाहेर आणले. त्यानंतर तिचे अपहरण करत वानवडी परिसरात नेले आणि तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. तब्बल दोन दिवस हा सर्व प्रकार सुरु होता.

दरम्यान रविवारी (5 सप्टेंबर) सायंकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली. वानवडी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ या प्रकरणी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आरोपींची ओळख पटवून सुरुवातीला आठ जणांना अटक करण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत एकूण आरोपींची संख्या 17 वर गेली आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

पीडितेची पोलिसात तक्रार

संबंधित घटना ही 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत घडल्याची माहिती पीडितेने दिली आहे. पीडितेने याबाबत पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने कारवाई करण्यास सुरुवात केली.

संबंधित बातम्या :

गावी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला गोड बोलून रेल्वे स्थानकाबाहेर आणलं, नंतर अपरहरण करुन दोन दिवस सलग सामूहिक बलात्कार, पुणे हादरलं

Pune Crime | वानवडीत अल्पवयीन मुलीवर गँगरेप, रेल्वेचे दोन कर्मचारी निलंबित

Pune : वानवडी बलात्काराची धडकी भरवणारी माहिती, 13 वर्षीय मुलीवर 14 जणांकडून बलात्कार, आतापर्यंत 17 जणांना बेड्या

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...