Pune Crime | वानवडीत अल्पवयीन मुलीवर गँगरेप, रेल्वेचे दोन कर्मचारी निलंबित

पीडित 13 वर्षीय मुलगी ही 31 ऑगस्टच्या रात्री गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर आली होती. यावेळी काही आरोपींना इतक्या रात्री तुला गाडी मिळणार नाही, असे सांगून रेल्वे स्थानकाबाहेर आणले. त्यानंतर तिचे अपहरण करत वानवडी परिसरात नेले आणि तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला.

Pune Crime | वानवडीत अल्पवयीन मुलीवर गँगरेप, रेल्वेचे दोन कर्मचारी निलंबित
पुणे गँगरेप प्रकरणी दोन रेल्वे कर्मचारी निलंबित
Follow us
| Updated on: Sep 07, 2021 | 8:53 AM

पुणे : पुण्यातील वानवडी भागात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्या प्रकरणी रेल्वेच्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. पुणे रेल्वे स्थानक परिसरातून 13 वर्षीय मुलीचं अपहरण करुन रेल्वेतील दोन कर्मचारी आणि काही रिक्षा चालकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे

प्रशांत सॅमियल गायकवाड (टीएलअँडएसी, विद्युत विभाग, पुणे स्थानक) आणि राजकुमार रामनगिना प्रसाद (इलेक्ट्रिक आणि देखभाल, विद्युत विभाग, पुणे स्थानक) अशी निलंबित कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या प्रकरणात या दोघा रेल्वे कर्मचाऱ्यांसह एकूण आठ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

नेमकं काय घडलं?

पीडित 13 वर्षीय मुलगी ही 31 ऑगस्टच्या रात्री गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर आली होती. यावेळी काही आरोपींना इतक्या रात्री तुला गाडी मिळणार नाही, असे सांगून रेल्वे स्थानकाबाहेर आणले. त्यानंतर तिचे अपहरण करत वानवडी परिसरात नेले आणि तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. तब्बल दोन दिवस हा सर्व प्रकार सुरु होता.

दरम्यान रविवारी (5 सप्टेंबर) सायंकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली. वानवडी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ या प्रकरणी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपींची ओळख पटवून तब्बल आठ जणांना अटक करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

पीडितेची पोलिसात तक्रार

संबंधित घटना ही 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत घडल्याची माहिती पीडितेने दिली आहे. पीडितेने याबाबत पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने कारवाई करण्यास सुरुवात केली. या कारवाई त्यांनी आठ आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

आरोपींना पोलिसांचा धाक नाही

पुण्यासारख्या जिल्ह्यात सामूहिक बलात्काराच्या घटना घडत असतील तर आरोपींना पोलिसांचा जराही धाक राहिलेला नाही का, असा सवाल या निमित्ताने विचारला जात आहे. आरोपी अवघ्या 13 वर्षांच्या मुलीचं अपहरण करतात, त्यानंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार करतात, दोन दिवस या घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली नाही का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आरोपींच्या मनात पोलिसांविषयी भीती राहिलेली नाही. त्यातूनच या अशा घटना घडत आहेत, असं मत आता स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केलं जात आहे. तसेच आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे.

हेही वाचा :

गावी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला गोड बोलून रेल्वे स्थानकाबाहेर आणलं, नंतर अपरहरण करुन दोन दिवस सलग सामूहिक बलात्कार, पुणे हादरलं

घरकाम करणाऱ्या महिलेची दगडाने ठेचून हत्या, कल्याणच्या उच्चभ्रू भागात मृतदेह आढळला

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.