AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

के पी गोसावीला शोधण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचं सर्च ऑपरेशन, त्याचं शेवटचं लोकेशन आगरतळा

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात पंच राहिलेला के पी गोसावी म्हणजे किरण गोसावी याच्या शोधासाठी महाराष्ट्र पोलिसांनी देशभराच सर्च ऑपरशेन सुरु केलं आहे. के पी गोसावीवर आतापर्यंत चार गुन्हे दाखल आहेत.

के पी गोसावीला शोधण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचं सर्च ऑपरेशन, त्याचं शेवटचं लोकेशन आगरतळा
किरण गोसावी
| Edited By: Chetan Patil | Updated on: Oct 18, 2021 | 5:48 PM
Share

मुंबई : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात पंच राहिलेला के पी गोसावी म्हणजे किरण गोसावी याच्या शोधासाठी महाराष्ट्र पोलिसांनी देशभराच सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे. के पी गोसावीवर आतापर्यंत चार गुन्हे दाखल आहेत. वेगवेगळ्या प्रकरणांच्या तापासासाठी पोलीस आरोपी के पी गोसावीचा शोध घेत आहेत. के पी गोसावी याचं शेवटचं लोकेशन आगरतळा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दर दोन तासांनी के पी गोसावी हा फोन स्विच ऑफ आणि ऑन करत असल्याचं तांत्रिक तपासात निष्पन्न झालंय. पोलिसांची नजर चुकवण्यासाठी आरोपी गोसावी हा कोलकाता, दिल्ली, आगरतळा असा प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे.

किरण गोसावीच्या महिला सहाय्यकाला अटक

नोकरीच्या आमिषाने फसवणूक केल्याच्या प्रकरणात फरार असलेल्या किरण गोसावीच्या असिस्टंटला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. शेरबानो कुरेशी असं महिला सहाय्यकाचे नाव आहे. पुणे पोलिसांनी शेरबानो हिला मुंबईतून अटक केली आहे. आरोपी किरण गोसावी शेरबानो फोन केल्याचा पोलिसांना संशय आहे.

नेमकं प्रकरण काय?

पुण्यातील चिन्मय देशमुख नावाच्या तरुणाची 2018 मध्ये फसवणूक केल्याचा आरोप आहे. मलेशियात नोकरी लावण्याच्या आमिषाने किरण गोसावी आणि शेरबानो कुराशी यांनी चिन्मयची तीन लाखांना फसवणूक केली होती. त्यानंतर 2018 मध्ये दोघांवर पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. याच गुन्ह्यात पुणे पोलिसांनी शेरबानो कुरेशीला मुंबईतून अटक केली. तिला आज कोर्टात हजर केले जाणार आहे.

दुसरीकडे, किरण गोसावीचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची दोन पथकं कार्यरत झाली आहेत. महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यांमध्ये किरण गोसावीचा शोध घेतला जात आहे.

पालघरमधील दोन तरुणांचीही फसवणूक

पालघर जिल्ह्यातील एडवण येथील दोन तरुणांची फसवणूक केल्याप्रकरणी किरण गोसावी यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केळवे सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दोन तरुणांना परदेशात नोकरीनिमित्त पाठवण्यासाठी दीड लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. उत्कर्ष तरे आणि आदर्श तरे या दोन तरुणांची गोसावींनी फसवणूक केल्याचा दावा केला जात आहे. आर्यन खान प्रकरणात NCB ने ज्याला पंच केलाय, तोच फसवणुकीचं रॅकेट चालवत असल्याचा धक्कादायक आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे.

मलेशियात नोकरीचं आमिष

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामध्ये एनसीबीने किरण गोसावी याला साक्षीदार बनवलेलं आहे. याच किरण गोसावीने अनेक तरुणांची फसवणूक करून त्यांना परदेशात नोकरी देण्याच्या आमिषाने लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. पालघर तालुक्यातील एडवण या गावातील दोन तरुणांचीही त्याने दोन वर्षांपूर्वी फसवणूक केल्याचा आरोप झाला आहे. उत्कर्ष तरे आणि आदर्श तरे या दोन तरुणांना मलेशिया येथे कामाला लावतो असे सांगून त्यांच्याकडून दीड लाखाची मागणी गोसावी याने केली होती.

फेसबुकवरुन ओळख

नवी मुंबई येथील कार्यालयातून किरण गोसावी हे फसवणुकीची रॅकेट चालवत होता. फेसबुकवरून मैत्री झाल्यानंतर उत्कर्ष आणि आदर्श यांना गोसावीने मलेशियाला कामाला लावण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर दोघांनीही गोसावीला बँक खात्यात पैसे पाठवले. त्यानंतर त्याने दोघांनाही विमानाचे तिकीट आणि व्हिसा दिला. कोचीन विमानतळावर पोहोचल्यानंतर विमानाचे तिकीट आणि व्हिसा बोगस असल्याचे त्यांना समजले. ते पालघरला परत आले आणि आपली फसवणूक झाल्या प्रकरणी केळवा पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते.

आम्हाला न्याय द्या

केळवा पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही म्हणून दोघांनीही तक्रार अर्ज दाखल केला. त्यानंतर दोन वर्षे उलटूनही पोलिसांनी कारवाई केली नसल्याचे उत्कर्ष तरे याने सांगितले होते. माझ्यासारख्या अनेक तरुणांची फसवणूक झाल्याची दाट शक्यता असल्याचे उत्कर्ष याने सांगितले. आमच्या फसवणूक प्रकरणामध्ये किरण गोसावी याला पोलिसांनी पकडून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी. आम्हाला न्याय मिळवून द्यावा असे उतकर्ष तरे आणि आदर्श तरे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना उत्कर्ष तरे यांनी सांगितले होते.

आर्यन खान प्रकारणामधील पंच किरण गोसावी विरोधात फसवणूक केल्याची तक्रार केळवा पोलीस ठाण्यात दोन वर्षापूर्वी देण्यात आली होती. किरण गोसावी यानं फसवणूक केल्याचा आरोप उत्कर्ष तरे आणि आदर्श तरे या दोन तरुणांनी केला आहे.

के. पी. गोसावी नेमका कोण?

व्हायरल झालेले कथित एनसीबी अधिकारी किरण गोसावी हे देशभरात, परदेशात नोकरी मिळवून देणाऱ्या के. पी. जी. ड्रीम्ज रिक्रूटमेंट कंपनीचे मालक असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे के. पी. जी. ड्रीम्ज कंपनीचं मुंबई आणि नवी मुंबईत कार्यालय आहे. बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात, खासगी गुप्तहेर अशीही के. पी. गोसावी यांची ओळख आहे. गोसावी स्वत:च्या वाहनावर पोलिसांची पाटी लावून फिरताना कॅमेऱ्यात कैद असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय नवाब मलिक यांनीही तसा दावा केला आहे. के. पी. गोसावी यांच्याविरोधात 2018 मध्ये पुण्यातील तरुणाकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. मलेशियात नोकरीचं आमिष दाखवून 3 लाख उकळल्याचा आरोप संबंधित तरुणाने केला होता, अशीही माहिती आता समोर येताना दिसत आहे.

हेही वाचा :

VIDEO : महिलेचा पतीवर परस्त्रीसोबत अनैतिक संबंधांचा संशय, जीममध्ये नवऱ्याच्या मैत्रिणीला चपलेने झोडपलं

Video | भरधाव वेगात कार, दोन तरुणींना चिरडलं, अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरलॉ

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा.

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा

Gold Price Today : टेन्शन टेन्शन.. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव चढेच; आज 10 ग्रॅमचा दर...

Gold Price Today : टेन्शन टेन्शन.. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव चढेच; आज 10 ग्रॅमचा दर..

CJP Protest: तर हे कोणासोबतही होऊ शकतं…विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन भडकली.

CJP Protest: तर हे कोणासोबतही होऊ शकतं…विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन भडकली

वाट लागली… भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ...

वाट लागली… भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ..

Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं.

Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं

हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त.

हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त