Video | भरधाव वेगात कार, दोन तरुणींना चिरडलं, अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल

जालंधरमधील फगवाड महामार्गावर अंगाचा थरकाप उडवणारा अपघात झाला आहे. या अपघतात एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी आहे. एका पोलीस उपनिरीक्षकाच्या गाडीनेच या दोन्ही तरुणींना उडवले आहे. या सर्व घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.

Video | भरधाव वेगात कार, दोन तरुणींना चिरडलं, अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
PANJAB ACCIDENT


चंदीगड : जालंधरमधील फगवाड महामार्गावर अंगाचा थरकाप उडवणारा अपघात झाला आहे. या अपघतात एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून एक तरुणी गंभीर जखमी आहे. पोलीस उपनिरीक्षकाच्या गाडीनेच या दोन्ही तरुणींना उडवले आहे. या सर्व घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद करण्यात आलाय.

रस्ता ओलांडताना भरधाव कार थेट अंगावर आली

मिळालेल्या माहितीनुसार अपघातात मृत्युमुखी पडलेली तरुणी धन्नोवाली येथील रहिवाशी असून नवजोत कौर असे तिचे नाव आहे. ही तरुणी आपल्या मैत्रीणीसोबत एका खासगी कंपनीत कामाला होती. काम आटोपून ही तरुणी मैत्रिणीसोबत घरी परतत होती. यावेळी त्या रस्ता ओलांडत होत्या. मात्र समोरुन पोलीस उपनिरीक्षकाची गाडी भरधाव वेगाने आली. तरुणींनी मागे होण्याचा प्रयत्न केला. पण ही कार थेट त्यांच्या अंगावरुन गेली.

पाहा व्हिडीओ :

पोलिसानेच तरुणींच्या अंगावर गाडी घातली   

या भीषण अपघातात नवजोत कौर नावाच्या तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर दुसरी तरुणी गंभीर जखमी झाली आहे. जखमी तरुणीवर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. एका पोलिसानेच तरुणींच्या अंगावर गाडी घातल्यामुळे मृत तरुणीचे कुटुंबीय कडक कारवाई करण्याची मागणी करत आहेत. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पुण्यात तरुण तरुणी दुभाजकावर आदळले, दोघांचाही मृत्यू

तर दुसरीकडे  पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे 17 ऑक्टोबर रोजी अंगाचा थरकाप उडवणारा एक अपघात झाला. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर पुण्याहून मुंबईकडे जाताना आकुर्डी येथे भरधाव वेगात आलेली दुचाकी दुभाजकावर थेट धडकली होती. या अपघातात दुचाकीवर स्वार असलेल्या आर्यन परमार आणि श्वेता गजबे यांचा मृत्यू झाला होता. तर अन्य दोन दुचाकीस्वार तरुणी जखमी झाल्या होत्या.

नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्याच्या दुभाजकावर थेट आदळले

मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात आकुर्डी येथे झाला होता. अपघात झालेल्या दुचाकीवर एक तरुण आणि तरुणी प्रवास करत होते. ही दुचाकी भरधाव वेगात जात होती. यावेळी नियंत्रण सुटल्यामुळे दोघेही रस्त्याच्या दुभाजकावर थेट आदळले. यातच त्यांचा मृत्यू झाला होता. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये दुचाकीनेही थेट पेट घेतला होता. आर्यन परमार आणि श्वेता गजबे असे मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.

इतर बातम्या :

VIDEO : महिलेचा पतीवर परस्त्रीसोबत अनैतिक संबंधांचा संशय, जीममध्ये नवऱ्याच्या मैत्रिणीला चपलेने झोडपलं

Viral Video | विद्यार्थ्याचे केस पकडून शिक्षकाची लाथाबुक्क्यांनी मारहाण, वर्गातील मुलांकडून व्हिडीओ रेकॉर्ड

अतिवृष्टीमुळे सारं पीक वाहून गेलं, डोक्यावर कर्जाचा डोंगर, भरलेला संसार अर्ध्यावर सोडून बीडमध्ये शेतकऱ्याची

(punjab Jalandhar horrifying accident two young girl dies cctv footage went viral on social media)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI