AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : महिलेचा पतीवर परस्त्रीसोबत अनैतिक संबंधांचा संशय, जीममध्ये नवऱ्याच्या मैत्रिणीला चपलेने झोडपलं

काही दिवसांपूर्वी एका महिलेने तिच्या पतीच्या प्रेयसीला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अगदी तशाच घटनेची पुनरावृत्ती मध्यप्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळ शहरात समोर आली आहे.

VIDEO : महिलेचा पतीवर परस्त्रीसोबत अनैतिक संबंधांचा संशय, जीममध्ये नवऱ्याच्या मैत्रिणीला चपलेने झोडपलं
महिलेचा पतीवर परस्त्रीसोबत अनैतिक संबंधांचा संशय, जीममध्ये नवऱ्याच्या मैत्रिणीला चपलेने झोडपलं
| Edited By: | Updated on: Oct 18, 2021 | 4:11 PM
Share

भोपाळ : काही दिवसांपूर्वी एका महिलेने तिच्या पतीच्या प्रेयसीला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अगदी तशाच घटनेची पुनरावृत्ती मध्यप्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळ शहरात समोर आली आहे. खरंतर भोपाळमधल्या घटनेत थोडंफार वेगळं असू शकतं. या घटनेत महिलेला आपल्या पतीवर संशय होता. त्या संशयातून तिने आपल्या पतीच्या मैत्रिणीला मारहाण केलीय. पण या मारहाणीचा व्हिडीओ देखील आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नेमकं प्रकरण काय?

संबंधित घटना ही भोपाळच्या कोहेफिजा भागात घडली. कोहेफिजा येथील एका जीममध्ये एक महिला आपल्या बहिणीसह दाखल झाली. तिथे ती आपल्या पतीला दुसऱ्या महिलोसोबत बघते. त्यानंतर तिच्या संतापाचा पारा चढतो. महिला आपल्या पतीच्या मैत्रिणीला मारहाण करायला सुरुवात करते. यावेळी जीममध्ये व्यायाम करणारी दुसरी महिला तिला वाचवण्यासाठी पुढे येते. ती तिला वाचवत जीममध्ये घेऊन जाते. पण त्या व्यक्तीची पत्नी तिला जीममध्ये जाऊन मारहाण करते. विशेष म्हणजे तिथे उपस्थित असलेल्या काही प्रत्यक्षदर्शींनी हा प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला. तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

महिलेला अनेक दिवसांपासून पतीवर संशय

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित घटना ही कोहेफिजा परिसरात 15 ऑक्टोबरला घडली आहे. या प्रकरणात पतीच्या मैत्रिणीला मारहाण करणाऱ्या महिलेला आपल्या पतीवर बऱ्याच दिवसांपासून संशय होता की, त्याचं बाहेर कुठल्यातरी महिलेसोबत अनैतिक संबंध आहेत. पण तिचा पती ते मान्य करण्यास तयार नव्हता. अखेर महिलेने आपल्या पतीचा पाठलाग करण्याचं ठरवलं. त्यानुसार ती आपल्या बहिणीसह 15 ऑक्टोबरला तिच्या पतीचा पाठलाग करत होती. ती पतीचा पाठलाग करत एका जीममध्ये जाऊन पोहोचली. तिथे तिचा पती दुसऱ्या कुठल्या महिलेसोबत होता. यावेळी पत्नीने त्या महिलेला मारहाण केली.

मारहाण करणाऱ्या महिलेविरोधात पोलिसात तक्रार दाखल

विशेष म्हणजे संबंधित पत्नीने याआधीच तिचा पती आणि सासरच्यांविरोधात हुंड्यासाठी छळ केला जात असल्याची तक्रार पोलिसात दिली आहे. पण त्यानंतर आता पतीच्या मैत्रिणीने त्या महिलेविरोधात मारहाणीची तक्रार दिली आहे. दोन्ही पक्षांकडून केस दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांनी दोघांना तपासात सहभागी होण्याची नोटीस दिली आहे.

मुंबईत गेल्यावर्षी भर ट्राफिकमध्ये असाच काहिसा प्रकार

मुंबईत गेल्यावर्षी ऐन ट्राफिकमध्ये ‘पती, पत्नी और वो’ चा राडा पाहायला मिळाला. स्वत:च्या पतीला परस्त्रीसोबत पाहिल्यानंतर पत्नीने भर रस्त्याच हंगामा केला होता. हाजी अलीपासून काही मीटर अंतरावरील पेडर रोडजवळील पेट्रोल पंप परिसरात हा सर्व प्रकार घडला होता. या प्रकरणाच्या व्हायरल झालेल्आ व्हिडीओत ती महिला, तिचा पती आणि त्याची प्रेयसी दिसत होती. पतीला परस्त्रीसोबत पाहिल्यानंतर पत्नीने भर रस्त्यातच मारहाण केली. इतकचं नव्हे तर रस्त्यातच गाडी अडवत ती गाडीच्या बोनेटवर चढत तिने हंगामा केला होता.

संबंधित घटनेचा व्हिडीओ बघा : न्यूजट्रॅकच्या फेसबुक पेजवर या घटनेचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. तो पुढीलप्रमाणे :

हेही वाचा :

मोठी बातमी: डॉ.राजन शिंदे यांच्या खुनातील शस्त्र अखेर सापडले, डंबेल, चाकू अन् टॉवेल पोलिसांच्या हाती, अल्पवयीन आरोपी ताब्यात

लाकडी दांडके-लोखंडी रॉड, नालासोपाऱ्यात दोन गट भिडले, तुंबळ हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.