Video : 27 प्रवाशांनी भरलेली खासगी बस पेटल्यानं खळबळ!

| Updated on: Oct 12, 2022 | 9:45 AM

नाशिकमधील बस दुर्घटनेनंतर आणखी एक थरकाप उडवणारी घटना समोर! पाहा बर्निंग बसचा थरार

Video : 27 प्रवाशांनी भरलेली खासगी बस पेटल्यानं खळबळ!
बस जळून खाक
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

सुनिल थिगळे, TV9 मराठी, पुणे : नाशिकमधील बस दुर्घटनेची (Nashik Bus Fire) घटना ताजी असतानाच आता आणखी एक थरकाप उडवणारी घटना पुण्यातून समोर आली आहे. पुणे जिल्ह्यात प्रवाशांनी भरलेली एक खासगी बस (Pune Bus Fire) पेटली. या बसमधून 27 प्रवासी प्रवास करत होते. आगीमध्ये ही बस पूर्णपणे जळून खाक (Pune Accident News) झालीय. सुदैवानं या घटनेमध्ये कोणताही जीवितहानी झाली नाही. मात्र भरस्त्यातच या बसने पेट घेतल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. MH 05 DK 9699 क्रमांकांची ही बस होती.

आग लागलेली खासगी बस ही भीमाशंकर इथं जाणारी होती. एका खासगी कंपनीची ही बस असून कंपनीचं नाव कळू शकलेलं नाही. पुणे जिल्ह्यातील घोडेगाव शिंदेवाडी गावाजवळ या बसने पेट घेतला. या बसमधील सर्व प्रवाशी सुखरुप असल्याची माहिती समोर आलीय.

हे सुद्धा वाचा

कशामुळे आग लागली?

थोडक्यात जीव वाचल्याने या बसमधील प्रवाशांनीही सुटकेचा निश्वास सोडलाय. दरम्यान, या बसमध्ये नेमकी आग कशामुळे लागली, हे कळू शकलेलं नाही. शॉर्ट सर्टिकमुळे या बसने पेट घेतला असावा, अशी शंका व्यक्त केली जाते आहे. बसमध्ये लागलेल्या आगीने प्रचंड नुकसान झालंय. बसमधील सीट, काचा आणि आतील बाजूचा पूर्णपणे कोळसा झाल्याचं दिसून आलंय.

पाहा व्हिडीओ :

बसमध्ये आग लागतेय हे पाहून प्रवाशांना तातडीने खाली उतरवण्यात आलं. बस रस्त्याच्या एका कडेला उभी करण्यात आली. त्यामुळे थोडक्यात मोठा अनर्थ टळलाय.

नाशिक बस दुर्घटना, 10 जण होरपळले

नाशिकमध्ये शनिवारी मोठी दुर्घटना घडली होती. नाशिकमध्ये झालेल्या ट्रक आणि बसमध्ये जोरदार धडक झाली होती. या धडकेनंतर डिझेल टँक फुटून अख्खी बस पेटली होती. या बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते. या बसमधील 10 प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता. तर अनेकजण जखमी झाले होते.

नाशिकमध्ये घडलेल्या या घटनेनंतर त्याच दिवशी आणखी एक बस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली होती. या दोन्ही घटना होऊन काही दिवसच उलटले आहेत. अशातच आता पुणे जिल्ह्यातही खासगी बसने पेट घेतल्याची घटना समोर आलीय. यामुळे खासगी बस वाहतुकीच्या सुरक्षेवर सवाल उपस्थित केले जात आहेत.