AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘भाईचा बड्डे, वाजले बारा’, पुण्यात गुन्हेगाराच्या वाढदिवसाचा भर रस्त्यात केक कापणाऱ्या तरुणांची धिंड

पुणे पोलिसांनी येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या गुन्हेगाराच्या वाढदिवसाचा भर रस्त्यात तलवारीने केक कापणाऱ्या तरुणांना चांगलीच अद्दल घडवली आहे. या तरुणांनी रस्ता अडवून तलवारीने गुन्हेगाराच्या वाढदिवसाचा केक कापला होता.

'भाईचा बड्डे, वाजले बारा', पुण्यात गुन्हेगाराच्या वाढदिवसाचा भर रस्त्यात केक कापणाऱ्या तरुणांची धिंड
| Updated on: Jan 12, 2024 | 10:14 PM
Share

अभिजीत पोते, Tv9 मराठी, पुणे | 12 जानेवारी 2024 : येरवडा तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा करण्यात अल्याचा प्रकार नुकताच समोर आलाय. पण गुन्हेराच्या वाढदिवसाचा भर रस्स्त्यात केक कापणाऱ्या तरुणांना पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. पुणे पोलिसांनी या आरोपींची थेट धिंडच काढली. त्यामुळे या प्रकरणाची पुण्यात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. पुण्याच्या जनवाडी परिसरात रात्री बारा वाजता काही तरुणांनी गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा केला होता. विशेष म्हणजे तरुणांनी ज्या गुन्हेगाराच्या वाढदिवसाचा केक भर रस्त्यात कापला होता त्याला पोलिसांनी मोक्काच्या गुन्ह्याअंतर्गत अटक केली होती. या प्रकरणी पोलिसांनी माहिती मिळताच आरोपींना चांगलीच अद्दल घडवली.

मोक्काच्या गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपीचा भर रस्त्यात केक कापणाऱ्या तरुणांना पोलिसांनी शोधून काढलं. त्यानंतर या तरुणांची भर पुणे शहरात धिंड काढण्यात आली. विशेष म्हणजे या मुलांनी येरवडा जेलची प्रतिकृती असलेला केक आणला होता. त्यावर गुन्हेगाराचा फोटो आणि येरवडा कारागृहाचा फोटो होता. गुन्हेगाराचे चाहते असलेल्या या तरुणांनी भर रस्ता अडवून, दुचाक्या उभ्या करून, तुरुंगात असलेल्या भाईचा वाढदिवस साजरा केला होता. विशेष म्हणजे या तरुणांनी केक तलवारीने कापला होता.

पोलिसांनी तरुणांना धडा शिकवला

तरुणांनी गुन्हेगाराच्या वाढदिवसाचा केक कापण्याचा प्रसंग मोबाईलच्या कॅमेऱ्यातही कैद केला होता. त्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावरही शेअर केला होता. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. त्यामुळे पोलिसांपर्यंत हा व्हिडीओ पोहोचला. पोलिसांनी हा व्हिडीओ पाहताच त्यातील तरुणांना शोधून काढलं. पोलिसांनी सर्व तरुणांना अटक केली. त्यानंतर त्यांनी जिथे केक कापला अगदी त्याच परिसरातून आरोपींची धिंड काढली. यावेळी आरोपी तरुणांनी मान खाली घातली होती. पुणे पोलिसांकडून आरोपींची धिंड काढण्याची ही स्टाईल तशी जुनीच आहे. पोलिसांनी अशाप्रकारे अनेक आरोपींना धडा शिकवण्याचा प्रयत्न केला आहे.

पुण्यात गुन्हेगारी कमी होईना

दरम्यान, पुण्यात गुन्हेगारी काही केल्या कमी होताना दिसत नाही. नुकतंच पुण्यात गुंड शरद मोहोळची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणातील मारेकऱ्यांना शोधून काढलं आहे. पोलिसांना या प्रकरणी तपासातून नवी माहिती देखील मिळत आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. पण या प्रकरणामुळे पुण्यातील भीषण गुन्हेगारीचं वास्तव समोर आलं आहे.

हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे.
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा.
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.