AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Mohol murder : शरद मोहोळ प्रकरणी आणखीन एका मुख्य आरोपीला पुणे पोलीस करणार अटक

Sharad Mohol murder case : पुणे येथील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्या प्रकरणात आणखी एक नवीन माहिती समोर आली आहे. शरद मोहोळ याच्या हत्येमागे आणखी एक मुख्य आरोपी आहे. या आरोपीला अटक करण्याची तयारी पुणे पोलिसांनी केली आहे.

Sharad Mohol murder : शरद मोहोळ प्रकरणी आणखीन एका मुख्य आरोपीला पुणे पोलीस करणार अटक
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jan 17, 2024 | 10:11 AM
Share

अभिजित पोते, पुणे दि.17 जानेवारी 2024 | पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची हत्या पूर्व वैमानस्यातून झाली आहे. या प्रकरणात आतापर्यंत पंधरा जणांना अटक करण्यात आली आहे. गुंड विठ्ठल शेलार आणि मुन्ना पोळेकर हे या हत्येच्या कटाचे सूत्रधार असल्याचे तपासातून समोर आले आहे. परंतु या प्रकरणात आणखी एका मुख्य सूत्रधार आहे. पुणे पोलीस त्याला अटक करणार आहे. या प्रकरणात विठ्ठल शेलार आणि मारणे टोळीतील रामदास मारणे या दोघांना देखील पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

नामदेव कानगुडे याने का केली हत्या

शरद मोहोळ याची हत्या अपमानाचा बदला घेण्यासाठी झाली. नामदेव कानगुडे याच्या टोळीकडून शरद मोहोळ याची हत्या झाल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर येत आहे. मामा नामदेव कानगुडे याचा केलेला अपमान सहन न झाल्याने भाचा मुन्ना पोळेकरकडून शरद मोहोळ याची हत्या केल्यायाची माहिती समोर आली आहे. तसेच या प्रकरणात गुंड विठ्ठल शेलार सूत्रधार आहे. त्याचा आणि शरद मोहोळ याचा जुना वाद होता. त्यातून मुन्ना पोळेकर आणि विठ्ठल शेलार यांनी हत्येचा कट रचला.

विठ्ठल शेलार याच्याशी काय होता वाद

विठ्ठल शेलार याच्यावरती देखील हिंजवडी परिसरात शरद मोहोळ याच्या सांगण्यावरून मोहोळ टोळीने हल्ला केला होता. त्याच्या बदला घेण्यासाठी नामदेव कानगुडे, मुन्ना पोळेकर आणि विठ्ठल शेलार एकत्र आले. त्यांनी शरद मोहोळ याची हत्या केल्याची माहिती समोर आली. अनेक दिवस नामदेव कानगुडे याने शरद मोहोळ याच्या टोळीतच काम केले होते.

आणखी एक मुख्य आरोपी

शरद मोहोळ हत्या प्रकरणात नामदेव कानगुडे याला आधीच पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. आता शरद मोहोळ प्रकरणी आणखी एका मुख्य आरोपीला पुणे पोलीस अटक करणार आहे. यासंदर्भात महत्वाचे धागेदोरे पोलिसांना मिळाले आहे. नामदेव कानगुडे, विठ्ठल शेलार आणि आणखीन एका आरोपीने एकत्रित बैठक घेत रशरद मोहोळ याच्या हत्येचा कट रचला होता.

Follow Us
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
Mumbaicha Raja 2026 | मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला;
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला; म्हणाले, 'वातावरण खराब होऊ नये...
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
Mahendra Thorave | महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम! महेंद्र थोरावेंचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल
हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
Ratnagiri Ganeshotsav | हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला
Rajapur | राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला; अपघातात 8 ते 10 जण गंभीर जखमी, नेमकं घडलं काय?
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी...
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी प्रकरणात एकाला अटक
भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
Bhopal | भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! जरांगेंचं भाजपला आव्हान
Manoj Jarange Patil | मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! मनोज जरांगेंचं भाजपला थेट आव्हान; बावनकुळेंवरही केले गंभीर आरोप
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे..
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे आश्वासन