पुण्यात स्कूल बसला अपघात, 12 विद्यार्थी गंभीर जखमी

| Updated on: Sep 27, 2022 | 9:49 PM

आंबेगाव तालुक्यातील गिरवली जवळील आयुका केंद्रावरून परत येताना या शाळेच्या बसला अपघात झाला.

पुण्यात स्कूल बसला अपघात, 12 विद्यार्थी गंभीर जखमी
पुणे सातारा महामार्गावर लक्झरी बसचा भीषण अपघात
Image Credit source: Google
Follow us on

पुणे / सुनील जाधव (प्रतिनिधी) : घोडेगाव येथे शाळेच्या बसला भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना आज घडली. या अपघातात 12 विद्यार्थी गंभीर तर 32 विद्यार्थी किरकोळ जखमी (Injured) झाले आहेत. गंभीर जखमी विद्यार्थांना उपचारासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वाहनचालकांचा बसवरील ताबा (Control) सुटल्याने बस 100 फूट दरीत पलटी झाली. आंबेगाव तालुक्यातील पिंपळ घोडे येथील मुक्ताई प्रशालेचे हे सर्व विद्यार्थी आहेत. सर्व विद्यार्थी आयुका दुर्बिण पाहण्यासाठी गेले असताना ही घटना घडली. या बसमध्ये 44 विद्यार्थी आणि 5 शिक्षक प्रवास प्रवास करत होते.

आयुका केंद्रावरुन परताना बसला अपघात

आंबेगाव तालुक्यातील गिरवली जवळील आयुका केंद्रावरून परत येताना या शाळेच्या बसला अपघात झाला. या बसमध्ये 44 मुले, 5 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी असे एकूण 49 जण होते. 100 फूट दरीत बस कोसळून हा अपघात झाला.

जखमी विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु

पिंपळगाव घोडे येथील मुक्ताई प्रशाला या हायस्कूलचे हे विद्यार्थी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 5 विद्यार्थी, 2 शिक्षक आणि एक ड्रायव्हर गंभीर जखमी झाले आहेत. घोडेगाव ग्रामीण रुग्णालय आणि मंचर उपजिल्हा रुग्णालयात तर काहींना पुणे येथे हलविण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

ही मुले आयुका केंद्रावर दुर्बीण पाहण्यासाठी शालेय अभ्यासासाठी साठी गेले होते. अपघात मोठा होता परंतु झाडे असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मोठी तीन झाडे तोडून बस दरीत कोसळली.

घटनास्थळी पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मुलांना बाहेर काढून घोडेगाव आणि मंचर येथील दवाखान्यात हलवले. आंबेगाव विद्या विकास मंडळ या संस्थेचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल होऊन मदत केली.