Pune | ओढणीने गळफास लावून आत्महत्या, महिलेच्या मृतदेहाजवळ आढळली रक्ताने माखलेली डायरी, गूढ वाढलं

पिंपरी-चिंचवड मधील सांगवी भागात एक धक्कादायक घटना घाडली आहे. या भागात का महिलेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. आज ( 20 सप्टेंबर) सकाळी ही घटना घडली आहे. महिलेच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

Pune | ओढणीने गळफास लावून आत्महत्या, महिलेच्या मृतदेहाजवळ आढळली रक्ताने माखलेली डायरी, गूढ वाढलं
संग्रहित छायाचित्र
Follow us
| Updated on: Sep 20, 2021 | 11:19 PM

पुणे : पिंपरी-चिंचवड मधील सांगवी भागात एक धक्कादायक घटना घाडली आहे. या भागात महिलेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. आज ( 20 सप्टेंबर) सकाळी ही घटना घडली. महिलेच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र, महिलेने ज्या ठिकाणी गळफास घेतला आहे, त्याच ठिकाणी रक्ताने माखलेली एक डायरी आढळली आहे. याच डायरीच्या मदतीने महिलेच्या आत्महत्येचे नेमके कारण समजून शकेल असा अंदाज व्यक्त केला जातोय. (women committed suicide in pimpri chinchwad of pune district diary found beside dead body)

ओढणीने गळफास घेत महिलेची आत्महत्या

मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवडमधील सांगवी या भागात एका महिले स्वत:च्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यासाठी महिलेने तिच्याच ओढणीचा उपयोग केला. या घटनेमुळे पिंपरी चिंचवड या भागात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे महिलेने आत्महत्या नेमकी का केली हे अजूनतरी समजू शकलेले नाही. मात्र, अचानकपणे समोर आलेल्या या घटनेमुळे तर्कवितर्क लावले जात आहेत.

मृतदेहाशेजारी आढळली रक्ताने माखलेली डायरी 

महिलेने केलेल्या कृत्याची माहिती होताच पिंपरी चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच महिलेच्या घराची पाहणी केली. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक पाहणीत महिलेच्या मृतदेहाजवळ रक्ताने माखलेली एक डायरी आढळून आली आहे. रक्ताने माखलेली डायरी मिळाल्यामुळे महिलेच्या आत्महत्येचं गूढ आणखीनच  वाढलं आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या डायरीला पंच आणि नातेवाईकांच्या समोर उघडण्यात येणार आहे.

आत्महत्येचे कारण लवकरच समोर येणार 

दरम्यान, डायरीमध्ये नेमकं काय आहे ? याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. नातेवाईकांसमोर ही डायरी उघडल्यानंतरच महिलेच्या आत्महत्येचा उलगडा होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून लवकरच सत्य समोर येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

इतर बातम्या :

लाखो रुपयांचे दागिने चोरीचा उलगडा, पहाटे मॉर्निंग वॉकल्या जाणाऱ्या वृद्धांना लक्ष्य करणारे चोरटे जेरबंद, पोलिसांची लाजवाब कामगिरी

चिमुकले शेततळ्याजवळ खेळत होते, खेळता-खेळता पाण्यात गेले, तिघांचा दुर्देवी अंत, अहमदनगर हळहळलं

जैसे ज्याचे कर्म तैसे.., चोरीसाठी दोन साथीदारांना घेऊन इमारतीवर चढला, चौथ्या मजल्यावर तोल गेला आणि….

(women committed suicide in pimpri chinchwad of pune district diary found beside dead body)

Non Stop LIVE Update
दोन मुडदे पडलेत आणि आरोपीला पिझ्झा-बर्गर, पुणे अपघातावर राऊत आक्रमक
दोन मुडदे पडलेत आणि आरोपीला पिझ्झा-बर्गर, पुणे अपघातावर राऊत आक्रमक.
कपिल पाटलांकडून निवडणूक आणि पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ? नेमकं काय घडल?
कपिल पाटलांकडून निवडणूक आणि पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ? नेमकं काय घडल?.
पोलिसांवर दबाव? पुणे अपघात प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त काय म्हणाले?
पोलिसांवर दबाव? पुणे अपघात प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त काय म्हणाले?.
ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत, भाजप नेत्याचं वक्तव्य
ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत, भाजप नेत्याचं वक्तव्य.
या जिल्ह्यातील विद्यार्थीन 12 वीत पटकावले 100 %; सांगितला फ्युचर प्लॅन
या जिल्ह्यातील विद्यार्थीन 12 वीत पटकावले 100 %; सांगितला फ्युचर प्लॅन.
संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही…
संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही….
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला 'हे' 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा इशारा
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला 'हे' 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा इशारा.
पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत सेल्फी काढलाय? व्हिडीओ बघा, तुम्ही म्हणाल..
पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत सेल्फी काढलाय? व्हिडीओ बघा, तुम्ही म्हणाल...
EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल
EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल.
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा.