धक्कादायकः दोस्ताची थट्टा दोस्ताच्या जीवावर…ढकलेला मित्र जागेवर गतप्राण…नाशिकमधली चटका लावणारी घटना

एका दोस्ताने (Friend) केलेली थट्टा मस्करी दुसऱ्या दोस्ताच्या चक्क जीवावर बेतल्याचा प्रकार नाशिकमध्ये (Nashik) घडला आहे. या घटनेत दुसऱ्या मित्राचा जागेवरच जीव गेला. काळजाचा थरकाप उडवणारी आणि जीवाला चटका लावणारी ही घटना शहरातल्या शिवाजीवाडी भागात घडली.

धक्कादायकः दोस्ताची थट्टा दोस्ताच्या जीवावर...ढकलेला मित्र जागेवर गतप्राण...नाशिकमधली चटका लावणारी घटना
संग्रहित छायाचित्र.

नाशिकः एका दोस्ताने (Friend) केलेली थट्टा मस्करी दुसऱ्या दोस्ताच्या चक्क जीवावर बेतल्याचा प्रकार नाशिकमध्ये (Nashik) घडला आहे. अरे, असा काय बसला आहेस म्हणून एका मित्राने दुसऱ्या मित्राला ढकलले. मात्र, या घटनेत दुसऱ्या मित्राचा जागेवरच जीव गेला. काळजाचा थरकाप उडवणारी आणि जीवाला चटका लावणारी ही घटना शहरातल्या शिवाजीवाडी भागात घडली. संतोष विष्णू वांगाडे ( वय 36) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी विष्णू पवारला पोलिसांनी (Police) बेड्या ठोकल्या आहेत. (Friend dies due to push by friend, incident in Nashik, accused arrested)

शिवाजीवाडी भागात महापालिकेची शाळा आहे. याच भागामध्ये संतोष विष्णू वागांडे यांचे घर आहे. संतोष रोज शाळा परिसरात मित्रांसोबत गप्पा मारण्यासाठी येतात. शनिवारीही ते शाळा परिसरात आले होते. ते नेहमीप्रमाणे शाळा परिसरातील वाळूच्या ढिगाऱ्यावर बसले होते. नेमके त्याचवेळी त्यांचा मित्र विष्णू किसन पवार (वय 35, रा. शिवाजीवाडी, भारतनगर) हा तिथे आला. त्याने संतोष यांच्याशी नेहमीप्रमाणे थट्टा मस्करी सुरू केली. या थट्टेतच त्यांनी संतोष यांना अजून घरी गेला नाहीस का, म्हणत जोराचा धक्का दिला. या धक्क्याने संतोष जमिनीवर पडले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागून त्यांचा जागीच जीव गेला. मित्राच्या हाताने मित्राचाच असा नकळत जीव जावा, या दुर्दैवी घटनेबद्दल परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी विष्णू किसन पवारला बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीवंत करत आहेत.

मजुराचा चिरला गळा

नाशिकच्या पंचवटीमध्ये अवघ्या 20 रुपयांसाठी आरोपीने कटरने गळा चिरुन मजुराचा खून केल्याची घटना घडली होती. संशयित आरोपी पंडित गायकवाड उर्फ लंगड्या याने बिडी पिण्यासाठी फिरस्ता असलेल्या मजुराकडे 20 रुपये मागितले. त्याने पैसे न दिल्याचा राग आल्याने आरोपीने त्याच्या गळ्यावर वार करुन त्याची निर्घृण खून केला. संशयित आरोपी पंडित गायकवाडला पंचवटी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जुना आडगाव नाक्यावरील राम रतन लॉज खाली घडलेल्या या घटनेने पोलिस खातेही हादरून गेले होते.

गुन्ह्यांमध्ये झाली वाढ

दरम्यान, गेल्या दिवसांमध्ये नाशिकमध्ये खून, चोरी, लूटमार असे गुन्हे वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक सायंकाळच्या वेळी एकटे घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर पोलिसांचा वचक राहिला नाही, पोलीस हेल्मेट सक्तीमध्ये व्यस्त असल्याचा आरोप नाशिककरांकडून केला जात आहे. (Friend dies due to push by friend, incident in Nashik, accused arrested)

इतर बातम्याः 

नाशिकः रात्रीस खेळ चाले…बिबट्याने पाडला शेळ्यांचा फडशा…शेतकऱ्यांनी घेतली कृषिमंत्र्यांची भेट

असा जीव तोळा तोळा…सोने 600 रुपयांनी स्वस्त…जाणून घ्या नाशिक सराफातील भाव

नाशिकच्या मुक्त विद्यापीठाने टाकली कात; आता पदवी प्रमाणपत्रे ‘डिजिलॉकर’द्वारे मिळणार

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI