नाशिकः रात्रीस खेळ चाले…बिबट्याने पाडला शेळ्यांचा फडशा…शेतकऱ्यांनी घेतली कृषिमंत्र्यांची भेट

नाशिक (nashik) जिल्ह्यातल्या मालेगाव (Malegaon) जवळच्या वडगाव परिसरात बिबट्याने (Leopard) दहशत माजवली आहे. त्यामुळे घाबरलेल्या शेतकऱ्यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांची भेट घेत बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली आहे.

नाशिकः रात्रीस खेळ चाले...बिबट्याने पाडला शेळ्यांचा फडशा...शेतकऱ्यांनी घेतली कृषिमंत्र्यांची भेट
नाशिक जिल्ह्यात बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे.

नाशिकः नाशिक (nashik) जिल्ह्यातल्या मालेगाव (Malegaon) जवळच्या वडगाव परिसरात बिबट्याने (Leopard) दहशत माजवली आहे. त्यामुळे घाबरलेल्या शेतकऱ्यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांची भेट घेत बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली आहे. (Another leopard caught in Nashik, action of forest department)

वडगाव परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. बिबट्याने 10 सप्टेंबर रोजी एका शेतातील गाईच्या वासरावर ताव मारला होता. त्यानंतर तो परिसरात अनेक ठिकाणी दिसून आला. बिबट्याने टाकेदवेगाव परिसरातील येल्याचीमेट शिवारात दोन मेंढपाळांच्या दोन शेळ्या फस्त केल्या आहेत. गेल्या चार दिवसांपूर्वी हा प्रकार घडला आहे. हे मेंढपाळ शेळ्या चारण्यासाठी रानात गेले होते. त्यांना घराकडे परतायला उशीर झाला. गावी येताना थोडा अंधारही पडला होता. नेमक्या याच यावेळी बिबट्याने शेळ्यांवर हल्ला चढवला. मेंढपाळांनी शेळीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून धाव घेतली. बिबट्यावर दगडांचा मारा करून पिटाळून लावले. मात्र, जखमी झालेल्या शेळीने जीव सोडला. बिबट्याच्या वावराने पंचक्रोशीतील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मशागतीच्या कामासाठी शेतात जायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे त्यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्या भेट घेत, बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली. मंत्र्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना परिसरात पिंजरा लावण्याच्या सूचना केल्या आहेत.

महिन्याच्या आत दोन बिबटे जेरबंद

गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात दोन बिबट्यांचा मुक्तसंचार सुरू होता. त्यापैकी एका बिबट्यासाठी बेलगाव कुऱ्हे येथील एका पोल्ट्री शेडजवळ नुकतेच पकडण्यात आले. वनविभागाने पिंजरा लावला होता. पिंजऱ्याच्या दुसऱ्या बाजूला सावज म्हणून एक शेळी बांधली होती. शिकारीच्या शोधात निघालेला बिबट्या पहाटे चारच्या सुमारास या पिंजऱ्यात अडकला. पिंजऱ्यातून बाहेर पडण्यासाठी त्याने लोखंडी जाळ्यांना धडका दिल्या. त्यामुळे तो रक्तबंबाळ झाला. चवताळलेल्या बिबट्याने डरकाळ्यांनी परिसर दणाणून सोडला. त्याला पाहण्यासाठी सकाळपासूनच परिसरातल्या नागरिकांची तोबा गर्दी जमली. अखेर भुलीचे इंजेक्शन देऊन या आक्रमक झालेल्या बिबट्याला बेशुद्ध करण्यात आले होते. पिंजरा रेस्क्यू व्हॅनला लावून वनविभागाचे अधिकारी त्याला घेऊन गेले. त्यानंतर दोनच दिवसात याच परिसरात दुसरा बिबट्याही पकडण्यात आला होता.

हिंस्त्र प्राणी गाव आणि शहराकडे

बिबट्यासारखा हिंस्त्र प्राणी वारंवार गाव आणि शहराकडे धाव घेण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. मानवाने प्राण्यांचा अधिवास बळकावला. जंगलांची अक्षरशः कत्तल केली. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. पर्जन्य चक्रात प्रचंड बदल झाले आहेत. एकाचवेळी अतिवृष्टी आणि एकाचवेळी दुष्काळाचा अनुभव आपण घेत आहोत. निसर्गाला ओरबाडने मानवाने थांबवले नाही, तर यापेक्षा भयंकर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा पर्यावरण तज्ज्ञ देत आहेत. (Another leopard caught in Nashik, action of forest department)

इतर बातम्याः

असा जीव तोळा तोळा…सोने 600 रुपयांनी स्वस्त…जाणून घ्या नाशिक सराफातील भाव

नाशिकच्या मुक्त विद्यापीठाने टाकली कात; आता पदवी प्रमाणपत्रे ‘डिजिलॉकर’द्वारे मिळणार

नाशिकमध्ये पावसाची हजेरी; जाणून घ्या दोन दिवसांचा अंदाज

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI