AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पार्किंगमधून बाईक चोरी, सोन्याचे दागिनेही पळवले, 24 वर्षीय तरुणाला अटक

सुतगिरणी टेकडीवर कमी दरामध्ये सोनं विक्री करण्यासाठी एक जण थांबला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी छापा टाकून विना नंबर प्लेटच्या मोटर सायकलवर बसलेल्या एकाला ताब्यात घेतले आणि एकामागून एक गुन्हे उघड झाले

पार्किंगमधून बाईक चोरी, सोन्याचे दागिनेही पळवले, 24 वर्षीय तरुणाला अटक
सांगलीत चोराला अटक
| Edited By: Anish Bendre | Updated on: Jul 05, 2021 | 12:56 PM
Share

सांगली : घरफोडी, दुचाकी चोरी प्रकरणातील सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले आहे. आकाश सतिश कवठेकर (वय 24) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून सोन्याचे दागिने, दोन दुचाकी, लॅपटॉप असा 2 लाख 30 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कुपवाड परिसरातील तीन गुन्ह्यांचा छडा लावण्यात आला आहे. (Sangli 24 years old youth arrested in Bike Laptop Gold Necklace theft case)

कसा लागला छडा?

सांगली आणि मिरज विभागात जबरी चोरी, घरफोडी आणि मोटर सायकल चोरी यासारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी एलसीबीने एक पथक तयार केले आहे. याबाबत माहिती घेत असताना सुतगिरणी टेकडीवर कमी दरामध्ये सोनं विक्री करण्यासाठी एक जण थांबला असल्याची माहिती पथकास मिळाली. पोलिसांनी छापा टाकून विना नंबर प्लेटच्या मोटर सायकलवर बसलेल्या एकाला ताब्यात घेतले. त्याला दुचाकीची कागदपत्रे आणि गाडी मालकाबाबत विचारले असता उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागला.

तरुणाकडे लॅपटॉप, सोन्याचे दागिने सापडले

गाडीच्या हँडलला अडकवलेल्या पिशवीत एक काळ्या रंगाचा लॅपटॉप आणि चार्जर सापडला. त्यानंतर पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे सोन्याचे एक नेकलेस, गंठण आढळले. त्याच्याकडील विना नंबरची मोटर सायकल, लॅपटॉप आणि सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहे.

पार्किंगमधून बाईक चोरीची कबुली

पोलिसांनी अधिक कसून चौकशी केली असता त्याने चार ते पाच दिवसांपूर्वी कुपवाड येथून दुचाकी चोरल्याची माहिती मिळाली. कुपवाडमध्ये भारत सुतगिरणीजवळ असलेल्या बिल्डिंगच्या पार्किंगमधून एक मोटर सायकल चोरल्याचे त्याने सांगितले. तर कुपवाडमध्ये एक बंद शेड फोडून तेथील लॅपटॉप आणि चार्जर चोरल्याचेही सांगितले. पुढील तपास करण्यासाठी कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाणे येथे गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

भंगारात सापडलेल्या स्कॉचच्या बाटल्यांतून बनावट मद्याची विक्री, मुंबईच्या दोघांना पुण्यात अटक

ज्येष्ठ नागरिकांना बोलण्यात गुंतवून दागिने-पैशांची चोरी, मिरा रोडमधून मायलेकाला अटक

(Sangli 24 years old youth arrested in Bike Laptop Gold Necklace theft case)

Follow Us
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला