AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्येष्ठ नागरिकांना बोलण्यात गुंतवून दागिने-पैशांची चोरी, मिरा रोडमधून मायलेकाला अटक

पंकज किशन पटेल (Pankaj Kishan Patel) आणि आई गीता किशन पटेल (Geeta Kishan Patel) यांना पोलिसांनी अटक केली. दोन्ही आरोपी मीरारोड येथे राहणारे असून मुंबई उपनगरांमध्ये ते कार घेऊन फिरत असतात.

ज्येष्ठ नागरिकांना बोलण्यात गुंतवून दागिने-पैशांची चोरी, मिरा रोडमधून मायलेकाला अटक
आरोपी मायलेकाला मिरा रोडमधून अटक
| Edited By: | Updated on: Jul 05, 2021 | 11:33 AM
Share

मुंबई : मुंबई उपनगरांमध्ये राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना निर्जन रस्त्यावर एकटं बघून आपल्या जाळ्यात अडकवणाऱ्या आणि फसवून लुटणाऱ्या आई आणि मुलाला चारकोप पोलिसांनी अटक केली आहे. ज्येष्ठ नागरिकांचे सोन्याचे दागिने आणि पैसे लुटून हे मायलेक पसार होत असत. (Mumbai Mira Road Mother Son Duo arrested for looting Senior Citizens)

काय होती मोडस ऑपरेंडी ?

पंकज किशन पटेल (Pankaj Kishan Patel) आणि आई गीता किशन पटेल (Geeta Kishan Patel) यांना पोलिसांनी अटक केली. दोन्ही आरोपी मीरारोड येथे राहणारे असून मुंबई उपनगरांमध्ये ते कार घेऊन फिरत असतात. रस्त्यात एखादा ज्येष्ठ नागरिक दिसला, की त्याच्याशी प्रेमाने गप्पा मारायच्या. त्यांना सामसूम रस्त्यावर नेऊन त्यांच्या गळ्यातील चेन आणि पैसे घेऊन फरार व्हायचं, अशी त्यांची मोडस ऑपरेंडी होती.

70 वर्षीय तक्रारदाराची लूट

चारकोप पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चारकोप परिसरात राहणाऱ्या 70 वर्षीय गणपत सुंदर पवार बँकेतून पैसे भरुन आपल्या घरी जात होते. तिथे त्यांना 40 ते 45 वर्ष वयोगटातील आरोपी महिला भेटली. पवार यांच्याशी गोड बोलून तिने त्यांना आपल्या जाळ्यामध्ये अडकवलं. त्यानंतर त्यांना एका अंडर-कन्स्ट्रक्शन इमारतीमध्ये ती घेऊन गेली. तिथून त्यांच्या गळ्यातली चेन घेऊन ती फरार झाली.

मुंबईत 14 हून अधिक तक्रारी

गणपत पवार यांनी चारकोप पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली. चारकोप पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज बघितल्यानंतर आरोपी मिरा रोड भागातील रहिवासी असल्याचं समोर आलं. कलम 420 अंतर्गत गुन्हा नोंदवून पोलिसांनी आरोपी मायलेकाला अटक केली. पोलिसांना तपासा अंतर्गत समजले की त्यांच्याविरुद्ध मुंबई आणि आसपासच्या भागांमध्ये 14 हून जास्त प्रकरणे दाखल आहेत.

संबंधित बातम्या :

विरारमध्ये वृद्धेची राहत्या घरी हत्या, चोरीच्या उद्देशाने हत्येचा संशय

घरातील महागड्या वस्तू, अंगावरील दागिने जशास तसे, तरीही वृद्ध महिला रक्ताच्या थारोळ्यात, आरोपींनी महिलेला का मारलं?

(Mumbai Mira Road Mother Son Duo arrested for looting Senior Citizens)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.