धक्कादायक, साताऱ्याच्या वाईमध्ये उच्चभ्रू कॉलनीत फॉरेनर्सची गांजा शेती, वर्षभरापासून बेकायदा वास्तव्य

| Updated on: Feb 16, 2021 | 6:20 PM

वाई शहरातील उच्चभ्रू कॉलनीमध्ये एका बंगल्यात दोन परदेशी व्यक्तींकडून गांज्याची मोठ्या प्रमाणात शेती केली जात असल्याच समोर आले आहे. (Wai two foreigners did illegal Ganja Farming )

धक्कादायक, साताऱ्याच्या वाईमध्ये उच्चभ्रू कॉलनीत फॉरेनर्सची गांजा शेती, वर्षभरापासून बेकायदा वास्तव्य
वाईत गांजा शेती करणारे परदेशी नागरिक
Follow us on

सातारा: जिल्ह्यातील वाई शहरातील उच्चभ्रू कॉलनीमध्ये एका बंगल्यात दोन परदेशी व्यक्तींकडून गांज्याची मोठ्या प्रमाणात शेती केली जात असल्याच समोर आले आहे. महत्वाच म्हणजे ही अमली पदार्थाची शेती ही या बंगल्याच्या आत मध्येच केली जात होती. धक्कादायक गोष्ट म्हणजे गांजा शेती करणाऱ्या व्यक्ती परदेशी आहेत. दोन परदेशी व्यक्तीच ही गांज्याची शेती गेल्या एक वर्षा पासून करत होत्या. पोलिसांनी ताब्यात आरोपींना ताब्यात घेतले तेव्हा त्यांनी माध्यम प्रतिनिधींच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. गांजा शेतीचा प्रकार उघडकीस आल्यानं वाईमध्ये खळबळ माजली आहे (Satara Wai two foreigners did illegal Ganja Farming in house)

गांजा शेतीसाठी आधुनिक तंत्राचा वापर

सातारा जिल्हयातील वाई येथील एका बंगल्यात परदेशी व्यक्तींनी गांजाची शेती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित या परदेशी व्यक्तींनी गेल्या वर्षभरापासून या बंगल्यामध्ये गांज्याची शेती करून तयार केलेला हा अमली पदार्थ बाहेर विकत असल्याचा प्रकार समोर आला आहे. सोमवारी रात्री सातारा पोलिसांनी या बंगल्यावर छापा टाकला. यानंतर बंगल्यात गांजा पिकवण्याचा धक्कादायक बाब समोर आली आहे.या बंगल्यात गांजा पिकवण्यासाठी अनेक आधुनिक तंत्राचा वापर हे परदेशी व्यक्ती करत होते ही बाब देखील समोर आली आहे.

पुण्यातील पथकाकडून माल सील

पुण्यातील अंमली पदार्थ तपासणी पथकाने हा सगळा माल सील करून ताब्यात घेतला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी जे की परदेशी तरुण आहेत त्यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, ज्यावेळी या परदेशी व्यक्तींना पोलीस व्हॅनमध्ये बसवलं जात होतं त्यावेळी हे परदेशी व्यक्ती चित्रीकरण करणाऱ्या मीडिया प्रतिनिधीच्या अंगावर धावून जात होते. त्याचबरोबर हाताच्या बोटांच्या वेगवेगळ्या कृती करून शिव्या देखील देत होत्या. हा सगळा प्रकार पोलिसांच्या समोरच सुरू होता.   संबंधित परदेशी व्यक्तीं आणि त्यांच्या कडून जप्त केलेला माल पोलिसांनी वाई पोलीस ठाण्यात आणला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

माध्यम प्रतिनिधींच्या अंगावर धावणारा परदेशी नागरिक

व्हिसा नसताना वास्तव्य

वाई शहरातील कॉलनी मध्ये एका बंगल्यातच गांज्याची मोठ्या प्रमाणात शेती केली जात असल्याचं समोर आले आहे. यामधील धक्कादायक बाब म्हणजे हे दोन परदेशी व्यक्ती गेल्या वर्षभरापासून या बंगलो मध्ये व्हिसा नसताना देखील राहत होते, अशी माहिती सातारा पोलीस दलातील अधिकारी धिरज पाटील यांनी दिली. मात्र, या बाबत कोणालाही कल्पना नव्हती. मात्र, काही पोलीस चौकशीसाठी आल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला आहे.

संबंधित बातम्या:

धुळ्यात पोलिसांकडून गांजाची शेती उद्ध्वस्त, 6 लाखांची गांजा रोपं जप्त

तुरीच्या पिकात गांजाचं आंतरपीक, 6 लाख 69 हजारांचा 133 किलो गांजा जप्त

(Satara Wai two foreigners did illegal Ganja Farming in house)