AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओळखीच्या मुलानेच केला घात, भाईंदरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

भाईंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (girl gang raped friend)

ओळखीच्या मुलानेच केला घात, भाईंदरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार
ही गोष्ट कोणाला समजली तर तुझे बॉक्सिंग करिअर खराब करेन, अशी धमकीही या प्रशिक्षकाने मुलीला दिली होती.
| Updated on: Feb 25, 2021 | 10:46 PM
Share

ठाणे : भाईंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 17 वर्षीय मुलीवर तिघांनी सामूहिक बलात्कार (gang rape) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मुलीला ओळखीच्या मुलानेच तिला फसवल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे. तशी तक्रार भाईंदर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलीये. सध्या तिन्ही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून या आरोपींना 4 मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. (seventeen year old girl has been gang raped by three men one of them is friend)

ओळखीच्या मुलानेच केला घात

दाखल तक्रारीनुसार भाईंदर परिसरात एक 17 वर्षीय मुलगी राहत होती. तिला तिच्या ओळखीच्या मुलाने त्याच्या घरी बोलावले. या ओळखीच्या मुलाने तसेच इतर दोघांनी तक्रारदार मुलीवर आळीपाळीने अत्याचार केला. त्यानंतर अत्याचार करुन जर कोणाला सांगशील तर याद राख अशा शब्दात पीडित मुलीला धमकीसुद्धा दिली.

आरोपींना 25 फेब्रवारीपर्यंत पोलीस कोठडी

दरम्यान, याबाबत पीडित मुलीने 25 फेब्रुवारी रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर तक्रार दाखल होताच पोलिसांनी सूत्रं हालवली. पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम 375 तसेच पोक्सो कायद्या अंतर्गत पोलिसांना गुन्ह्याची नोंद केली. त्यांनतर पोलिसांनी तक्रारीत नाव असलेल्या तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. मिळालेल्या माहितीनुसार तीन आरोपींपैकी दोन जण 20 ते 22 वर्षे या वयोगटातील आहेत. तर तिसरा आरोपी हा 50 वर्षे वयाचा आहे.

या आरोपींना अटक केल्यानंतर त्यांना ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने तिन्ही आरोपींना 4 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्याचा तपास भाईंदर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत भोसले हे करीत आहेत.

इतर बातम्या :

महाविद्यालयीन तरुणाकडून मैत्रिणीची हत्या, एकतर्फी प्रेमातून संपवलं

गर्भवती पत्नीची हत्या करुन मृतदेह घरातच लपवला, दुर्गंधीला कंटाळून पोलिसात कबुली

Sunny Leone | सनी लिओनीच्या कार नंबरचा दुरुपयोग, मुंबईत तरुणाविरोधात गुन्हा

(seventeen year old girl has been gang raped by three men one of them is friend)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.