गर्भवती पत्नीची हत्या करुन मृतदेह घरातच लपवला, दुर्गंधीला कंटाळून पोलिसात कबुली

गर्भवती पत्नीची हत्या करुन मृतदेह घरातच लपवला, दुर्गंधीला कंटाळून पोलिसात कबुली
Crime News

ग्रेटर नोएडाच्या बीटा-2 कोतवाली ठाणा क्षेत्रात एका व्यक्तीने आपल्या गर्भवती पत्नीची (Husband Murder Pregnant Wife) अतिशय निर्घृणपणे हत्या केली.

Nupur Chilkulwar

|

Feb 25, 2021 | 7:49 AM

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडामध्ये एक विचित्र घटना पुढे आली आहे (Husband Murder Pregnant Wife). ग्रेटर नोएडाच्या बीटा-2 कोतवाली ठाणा क्षेत्रात एका व्यक्तीने आपल्या गर्भवती पत्नीची अतिशय निर्घृणपणे हत्या केली. इतकंच नाही तर या व्यक्तीने पत्नीच्या हत्येनंतर दोन दिवसांपर्यंत मृतदेह घरातच ठेवला (Husband Murder Pregnant Wife).

पण, जेव्हा मृतदेहामधून दुर्गंधी येऊ लागली तेव्हा या पतीने थेट पोलीस ठाणे गाठलं. तिथे त्याने आपला गुन्हा कबुल केला. आरोपी व्यक्तीचं लग्न वर्षभरापूर्वीच झालं होतं.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी व्यक्तीची पत्नी 7 महिन्यांचा गर्भवती होती. दोन दिवसांपूर्वी जेव्हा आरोपी आपल्या घरी पोहोचला तेव्हा घरी त्याच्या पत्नीचा जुना मित्र घरी होता. यामुळे पती नाराज होता. त्यामुळे त्याने आपल्या पत्नीची हत्या केली. निर्घृणपणे पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने दोन दिवसांपर्यंत मृतदेह आपल्या घरातच ठेवला.

आरोपीने मृतदेहाला पुरण्याचा प्रयत्न केला

दरम्यान, आरोपी पतीने पत्नीचा मृतदेह पुरण्याचा प्रयत्नही केला. पण, तोपर्यंत मृतदेहातून दुर्गंधी येऊ लागली होती. त्यानंतर या दुर्गंधीला कंटाळून त्याने स्वत: पोलीस ठाणे गाठले आणि आपला गुन्हा कबुल केला. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत पतीला अटक केली. हे प्रकरण ग्रेटर नोएडाच्या बीटा-2 कोतवाली क्षेत्रातील अल्फा टू सेक्टर येथील आहे.

Husband Murder Pregnant Wife

संबंधित बातम्या :

आम्ही राहायचं कुठे? प्रॉपर्टीच्या वाद विकोपाला, मुलाकडून वडिलांची हत्या

पोलिसांसमोरच तरुणावर प्राणघातक हल्ला, कळवा पोलिसांकडून तिघांना अटक

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें