Jammu Kashmir News : घरात 6 मृतदेह आढळल्यानं खळबळ! मृतांमध्ये महिलांसह लहान मुलांचा समावेश, हत्या, आत्महत्या की आणखी काही?

सिदरा परिसरात असलेल्या एका घरात दोन मृतदेह आणि जवळच असलेल्या दुसऱ्या घरात चार मृतदेह आढळून आले आहेत. हे सर्व मृतदेह जम्मू काश्मिरातील सरकारी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहेत.

Jammu Kashmir News : घरात 6 मृतदेह आढळल्यानं खळबळ! मृतांमध्ये महिलांसह लहान मुलांचा समावेश, हत्या, आत्महत्या की आणखी काही?
जम्मू काश्मीरमधील खळबळजनक घटना
Image Credit source: Twitter
| Updated on: Aug 17, 2022 | 11:16 AM

जम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kashmir News) एका घरात सहा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ माजलीय. जम्मू काश्मिरच्या सिदरा परिसरातील एका घरात सहा मृतदेह सापडलेत. या बाबतची माहिती समोर आल्यानंतर लगेचच पोलिसांना कळवण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी लगेचच मृतदेह (Dead bodies) ताब्यात घेत पुढील तपास सुरु केला आहे. पोलिसांनी (Jammu News) दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी एकाच कुटुंबातील सहा सदस्य संशयास्पदरीत्य मृतावस्थेत आढळून आले. याबाबत अधिक तपास केला असता मृतदेहांची ओळखही पटवण्यात आली आहे. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश असल्यानं या प्रकरणाचं गूढ वाढलंय. एका कुटुंबातील व्यक्तींच्या मृत्यूमागे नेमकं कारण काय, याचा उलगडा करण्याचं आव्हान जम्मू काश्मीर पोलिसांसमोर उभं ठाकलंय.

मृतांमध्ये कुणाकुणाचा समावेश?

मृतांमध्ये सकीना बेगम नावाच्या महिलेचा समावेश आहे. सकीना बेगम यांच्या दोन मुला नसीमा अख्तर आणि रुबीना बानो यांचेही मृतदेह आढळले आहेत. तर मुलगा जफर सलील आणि दोघा नातेवाईंकांची मुलाही मृतावस्थेत आढळली आहेत. त्यांनी नावं नूर-उल-हबीब आणि सजाद अहमद अशी असल्याची माहिती समोर आली आहे. सिदरा परिसरात असलेल्या एका घरात दोन मृतदेह आणि जवळच असलेल्या दुसऱ्या घरात चार मृतदेह आढळून आले आहेत. हे सर्व मृतदेह जम्मू काश्मिरातील सरकारी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहेत. तसंच पोलिसांचं पथकही घटनास्थळी दाखल झालं असून त्यांनी तपास करण्यास सुरुवात केली आहे.

सहा जणांच्या मृत्यूचं कारण काय? ही हत्या आहे की सामूहिक आत्महत्या? याचं गूढ आता वाढलं आहे. एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आल्यानं स्पष्ट होईल, असं पोलिसांनी म्हटलंय. त्यातून अनेक गोष्टींचा उलगडा होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. तोपर्यंत या कुटुंबाची पार्श्वभूमी, त्याचे इतर नातेवाईक, शेजारी पाजारी, सहकारी यांच्याशी बातचीत करुन काही धागेदोरे सापडतात का, याचाही प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय.