कल्याण डोंबिवलीमध्ये युतीचा महापौर शंभर टक्के होणार – रवींद्र चव्हाण
"भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी असल्याचं डोंबिवली मध्ये जाणवते. कल्याण डोंबिवलीमध्ये युतीचा महापौर शंभर टक्के होणार. रिझल्ट देखील अतिशय चांगले येतील यात काही शंका नाही" असं रवींद्र चव्हाण म्हणाले.

“कल्याण-डोंबिवली हिंदुत्वाचा आणि जनसंघाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कडवट कार्यकर्त्या भाजपच्या जिल्हाध्यक्ष रेखा चौधरी आणि आसावरी नवरे अशा दोन उमेदवारासमोर कोणी अर्ज भरला नाही. त्या भागातील सर्वच नागरिकांचे मनःपूर्वक धन्यवाद” असं भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले. “ही व्यक्तिमत्व चांगली असल्याने विरोधकांनी या ठिकाणी अर्ज भरला नाही. त्यामुळे त्यांची ओळख मी आधी सांगितली. या उमेदवारांच्या समोर अर्ज भरू नये असा अनेकांनी विचार केला, त्या लोकांचेही मी आभार मानतो” असं रवींद्र चव्हाण म्हणाले.
“भारतीय जनता पार्टीने या वेळेला केंद्रीय नेतृत्वाप्रमाणे आणि देवेंद्रजींनी नवीन चेहऱ्याला संधी द्यायला सांगितलं. नेत्यांनी निर्णय घेतला असेल तरी कार्यकर्त्यांनी कुठेही नाराजगी व्यक्त केली नाही. म्हणून सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार” असं रवींद्र चव्हाण म्हणाले. “काही नगरसेवकांना उमेदवारी दिली नाही मात्र त्यांनी देखील नाराजगी व्यक्त न करता भाजपच्या विचारधारेसोबत काम करायला लागले आहेत” असं रवींद्र चव्हाण म्हणाले.
युतीचा महापौर शंभर टक्के होणार
“भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी असल्याचं डोंबिवली मध्ये जाणवते. कल्याण डोंबिवलीमध्ये युतीचा महापौर शंभर टक्के होणार. रिझल्ट देखील अतिशय चांगले येतील यात काही शंका नाही” असं रवींद्र चव्हाण म्हणाले.
भाजपा-महायुतीच्या विजयाला शुभारंभ
कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत भाजपा-महायुतीच्या विजयाला शुभारंभ झाला आहे. प्रभाग क्र. 18 मधून रेखाताई चौधरी आणि प्रभाग क्रमांक 26 क मधून आसावरी केदार नवरे यांची नगरसेविका पदी बिनविरोध निवड झाली आहे. या विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी फोन द्वारे दोन्ही विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.
काय चुकले असे की…
काय चुकले असे की, भारतीय जनता पक्षाने माझी उमेदवारी नाकारली अशा आशयाचे पोस्टर व्हायरल झाले आहेत. नरेंद्र मोदींच्या फोटो शेजारी लावले घड्याळाचे चिन्ह. काल केला राष्ट्रवादी अजित पावर गटात प्रवेश. किरण चार टक्के भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक यांची पोस्ट वायरल झाली आहे.
