कुठे कमी पडलो साहेब म्हणत कार्यकर्त्याने आमदारापुढे फोडला टाहो, संजय केनेकर भावूक थेट, अश्रू पुसत..
राज्यातील महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. काल निवडणुकीसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस होता. पक्षाने एबी फॉर्म न दिल्याने अनेक कार्यकर्ते नाराज असल्याचे बघायला मिळतंय. काहीजण तर थेट उपोषणालाही बसले आहेत.

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपा कार्यकर्त्ये आकमक झाल्याचे बघायला मिळत आहे. काल महापालिकेच्या निवडणुकीचे एबी फॉर्म वाटप करण्यात आले. मात्र, अनेक कार्यकर्त्यांना तिकिट मिळाले नसल्याने मोठी नाराजी बघायला मिळाली. फक्त नाराजीच नाही तर अनेकांनी थेट आत्मदहनाचा इशाराही दिला. काही लोक उपोषणाला बसली आहेत. भाजपातील इच्छुक नाराज कार्यकर्त्यांनी खासदार भागवत कराड आणि मंत्री अतुल सावे यांच्याही गाडीला घेराव घातला. आता तिकिट न मिळाल्याने कार्यकर्ते इतके जास्त नाराज झाले की, त्यांनी थेट प्रचार कार्यालयाच्या बाहेर बसून आपला रोष व्यक्त केला. यावेळी काही कार्यकर्त्यांना आपले अश्रू रोखणेही कठीण झाले. थेट ढसाढसा रडताना भाजपाचे कार्यकर्त्ये दिसत आहेत.
छत्रपती संभाजीनगरच्या भाजपा कार्यालयात नाराजांची गर्दी वाढताना दिसत आहे. शेवटी नाराजांची समजूत काढण्यासाठी आमदार संजय केनेकर अचानक तिथे पोहोचले. यावेळी कार्यकर्त्यांना ढसाढसा रडताना पाहून आमदारही भावूक झाले. भदाणे यांना रडताना पाहून संजय केनेकर यांनी त्यांना गळ्याला लावले आणि स्वत: त्याचे अश्रू देखील पुसले. संजय केनेकर सुरूवातीला भदाणे यांना समजवताना दिसले.
त्यानंतर मैदानातून कार्यालयात नेत आपल्या गाडीमध्ये संजय केनेकर भदाने यांना घेऊन गेले. आपल्या कार्यकर्त्याला अशाप्रकारे रडताना पाहून केनेकर यांचा चेहरा बरेच काही सांगून जाताना दिसला. केनेकर भदाने याच्याजवळ पोहोचताच मी कुठे कमी पडलो साहेब.. मी कुठे कमी पडलो… म्हणत भदाने टाहो फोडला…. यावेळी केनेकर म्हणाले की, मी पाया पडतो ऐक राजा.. मी आहे ना… न्याय देतो.. यावेळी भदाने हे संजय केनेकर यांच्या गळ्याला पडून रडताना दिसले…
यादरम्यान बोलताना संजय केनेकर यांनी म्हटले की, वर्षानुवर्ष कार्यकर्ता समर्पितपणे काम करत असतो. साहजिक आहे की, पक्ष एकाचवेळी सर्वांना न्याय देऊ शकत नाही. संताप होणे हे कार्यकर्त्याचे साहजिक आहे. संयम बाळगणे महत्वाचे आहे. दहा वर्षापासून कार्यकर्ते समर्पितपणे काम करत आहेत, असेही संजय केनेकर यांनी म्हटले. यावेळी भदाने हे रडताना दिसले. केनेकर त्यांची समजूत काढत होते.
