AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : सतत पोटात दुखायचं, अखेर आजीला सांगितलं; गतीमंद नातीसोबत जे घडलं ते ऐकून…

दक्षिण मुंबईत एका 20 वर्षीय गतीमंद मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यातून ती मुलगी गर्भवती झाली असून, 5 महिन्यांनंतर हे सत्य समोर आले. कफ परेड पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली आहे.

Mumbai Crime : सतत पोटात दुखायचं, अखेर आजीला सांगितलं; गतीमंद नातीसोबत जे घडलं ते ऐकून...
क्राईम न्यूज
| Updated on: Oct 11, 2025 | 10:37 AM
Share

मुंबईत गुन्ह्यांच्या घटनांमध्ये सतत वाढ होताना दिसत असून दक्षिण मुंबईत एक भयानक प्रकार समोर आला आहे. तेथे एका 20 वर्षांच्या गतीमंद मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याचे उघड झाले. 17 जणांनी तिच्यावर अत्याचर केला आणु त्यातून ती मुलगी गर्भवती राहिली. 5 महिने उलटून गेल्यानंतर ही भयानक घटना उघडकीस आली असून त्यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे. याप्रकरणी कफ परेड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीं विरोधात न्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली आहे. तर 17 जणांचे रक्ताचे नमुने डीएनए चाचणी साठी घेण्यात आले आहेत, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

पोटात दुखू लागलं, आजीला सांगितलं, भयानक सत्य उघड !

मिळालेल्या माहितीनुसीर, पीडित मुलगी गतीमंद असून ती 20 वर्षांची आहे. ती वडिलांसोबत दक्षिण मुंबईत राहते. तिला ऐकू येत नाही, नीट बोलताही येत नाही. काही दिवसांपासू त्या मुलीच्या पोटात सतत दुखत होतं, त्याबद्दल तिने जवळच राहणाऱ्या आजीला सांगितलं. त्यानंतर पीडितेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेव्हा धक्कादायकम बाब समोर आली. पीडित मुलगी ही पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे समजले, तेव्हा रुग्णालयाने याबद्दल पोलिसांना कळवलं.

हे प्रकरण समजल्यावर पोलिसांनी तेथे जात, पोलिस ठाण्यातील महिला पोलिस अधिकाऱ्यांनी त्या पीडित मुलीला बोलतं करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी स्वयंसेवी संस्थेची देखील मदत घेण्यात आली. संस्थेच्या समुपदेशकांनी चित्र आणि बोटांवर बसविण्यात येणाऱ्या बाहुल्यांच्या आधारे मानसोपचारपध्दतीने मुलीला बोलतं केलं.

2 जणांना अटक

5 दिवस समुदपदेशक तिच्याशी संवाद साधत होते, अखेर तिने दोघांची नावे वारंवार घेतली. आणि भयानक सत्य उघड झालं. ती मुलगी घरात एकटी असल्याची संधी साधून काही नरधामांनी तिच्यावर लैंगिक अत्याचर केला. पोलिसांनी याप्रकरणी 17 वर्षांचा अल्पवयीन मुलगा तसेच 33 वर्षांच्या इसमालाही अटक केली आहे. समुपदेशकांशी बोलताना त्या पीडित मुलीने आणखी 15 जणांची देखील नावं घेतली. त्या धारे पोलिसांनी त्या व्यक्तीच्या रक्ताचे नमुने घेतले असून डीएनए पडतळणीसाठी पाठवण्यात आले आहेत. आरोपींविरोधत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...