
हैदराबाद : काही लग्न सहजासहजी जुळतात, तर काही लग्न जुळवण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात. लग्न जुळल्यानंतर ते पूर्णत्वाला नेण ही सुद्धा एक मोठी जबाबदारी असते. लग्न म्हणजे मंगल, आनंद. लग्नामध्ये फक्त वधू-वरच नाही, तर दोन कुटुंब एकत्र येतात. पती-पत्नीप्रमाणे दोन कुटुंबाचही मनोमिलन असतं. काहीवेळा मानपानावरुन छोटो-मोठे खटके उडतात. भारतात वर पक्षाला वधू पक्षाकडून मानपानाच्या बऱ्याच अपेक्षा असतात. काही रितीरिवाजही तसे आहेत. लग्न मांडवात सुरु आहे, तिथे वधू-वराला आशिर्वाद देण्यासाठी पाहुणे मंडळी जमले आहेत आणि अशावेळी अचानक लग्न मोडलं, तर काय?. कल्पनाही करवत नाही, कारण जुळणारी दोन मन दुभंगली जातात.
नुकतच तेलंगणमध्ये असच एक लग्न मोडलं. याच कारण ठरलं मटनाची नळी. तुम्ही म्हणाल लग्न मोडण्यासाठी हे काय कारण आहे, पण असं घडलं. वधू पक्षाने नॉन व्हेज जेवणात मटणाची नळी ठेवली नाही, म्हणून वर पक्ष नाराज झाला. त्यांनी थेट लग्न मोडण्याचा टोकाचा निर्णय घेतला. नोव्हेंबर महिन्यात वधूच्या निवासस्थानी या जोडप्याचा साखरपुडा झाला होता. त्यावेळी वर पक्षाने जेवणात मटणाची नळी नाही म्हणून लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. वधू पक्षाने दोन्ही बाजूंच्या सर्व पाहुण्यांसाठी नॉन व्हेज मेन्यू ठेवला होता.
वर पक्षाने काय म्हटलं?
जेवणात मटणाची नळी नाहीय, हे पाहुणे मंडळीच्या लक्षात आल्यानंतर सगळ्या वादाला सुरुवात झाली. नवरी मुलीच्या कुटुंबियांनी जेव्हा सांगितलं, मटणाची नळी मेन्यूमध्ये नाहीय, त्यावेळी दोन्ही पक्षांमध्ये वाद वाढत गेला. भांडण इतक वाढलं की, पोलिसात हे प्रकरण गेलं. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करुन वाद मिटवला. वर पक्षाने हा आपला अपमान आहे असं म्हटलं. या सगळ्याची परिणीती साखरपुड्याला लग्न मोडण्यात झाली.