AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॅफेत अनैतिक कृत्य, आमदाराची धाड, तरुण-तरुणी आढळले धक्कादायक अवस्थेत

चाळीसगावातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या एका कॅफेत तरुण-तरुणींचा अनैतिक प्रकार सुरु होता. याबाबत मंगेश चव्हाण यांना माहिती मिळाली. त्यानंतर मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव पोलिसांसह कॅफेवर धाड टाकली. यावेळी त्यांना धक्कादायक अवस्थेत तरुण-तरुणी आढळून आले.

कॅफेत अनैतिक कृत्य, आमदाराची धाड, तरुण-तरुणी आढळले धक्कादायक अवस्थेत
| Updated on: Dec 26, 2023 | 7:32 PM
Share

खेमचंद कुमावत, Tv9 मराठी, जळगाव | 26 डिसेंबर 2023 : भाजपचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी चाळीसगावातील एका कॅफेची तोडफोड केली आहे. त्यांनी पोलिसांसह संबंधित कॅफेवर छापा टाकला. त्यानंतर मंगेश चव्हाण यांनी या कॅफेची तोडफोड केली. मंगेश चव्हाण यांनी या कॅफे मालकावर गंभीर आरोप केला आहे. कॅफे मालकाने तरुण आणि तरुणींना अनैतिक कृत्यासाठी जागा दिल्याचा आरोप मंगेश चव्हाणांनी केलाय. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मंगेश चव्हाण यांनी पोलिसांसह केलेल्या छापेमारीत तरुण-तरुणी गैरकृत्य करताना आढळून आल्याचं समोर आलं. त्यामुळे संतप्त झालेल्या मंगेश चव्हाण यांनी कॅफेची तोडफोड करायला सुरुवात केली. या प्रकरणाती आता संपूर्ण शहरात जोरदार चर्चा सुरु आहे.

गेल्या काही महिन्यांपासून चाळीसगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका अनाधिकृत कॅफेमध्ये तरुण-तरुणींना अनैतिक कृत्य करण्यासाठी कॅफे मालकाडून जागा उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती पोलिसांसह आमदर मंगेश चव्हाण यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे आज पोलिसांच्या पथकासह आमदार मंगेश चव्हाण यांनी कॅफेच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. यावेळी अंधारात काही तरुण-तरुणी आढळून आल्याचं दिसून आलं. या घटनेनंतर संतप्त झालेल्या आमदार मंगेश चव्हाण यांनी या कॅफेची स्वतःच तोडफोड केली.

कॅफे चालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

“शहराचे मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या कॅफेबाबत मी मागील वर्षीदेखील कॅफे चालकाला समज दिली होती. त्यानंतर काही काळासाठी या ठिकाणी सुरू असलेला हा प्रकार बंद देखील झाला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून या कॅफेमध्ये पुन्हा अनैतिक प्रकार सुरू झाल्याची माहीत सामोर आल्याने नगर पालिका प्रशासन, पोलीस प्रशासन आणि मी या ठिकाणी आलो. यावेळी या ठिकाणी गैरकृत्य करताना तरुण-तरुणी आढळून आले आहेत”, असं मंगेश चव्हाण यांनी सांगितलं.

“अशा प्रकारची गैरकृत्य कोणी करत असेल आणि त्याला कोणी जागा उपलब्ध करून देणार असेल तर ते कदापिही खपून घेतले जाणार नाही. वेळ पडली तर अशा इमारतींवर बुलडोझर देखील फिरविला जाईल”, असा इशारा भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी दिला आहे. दरम्यान, कॅफे चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मंगेश चव्हाण यांनी दिली.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.