Mumbai Police : अल्पवयीन मुलींना अश्लील मेसेज पाठवणाऱ्याला पोलिसांनी बडवलं, मुलीने नंबर ब्लॉक केल्यास…

मुलींना अश्लील मेसेज करायचा, नंबर ब्लॉक केल्यावरती अशा पद्धतीने व्हिडीओ पाठवायचा, चौकशीत नंबर कुठून मिळवायचा हे सांगितल्यावर पोलिस सुध्दा भांबावले

Mumbai Police : अल्पवयीन मुलींना अश्लील मेसेज पाठवणाऱ्याला पोलिसांनी बडवलं, मुलीने नंबर ब्लॉक केल्यास...
police
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Mar 24, 2023 | 12:30 PM

मुंबई : अल्पवयीन मुलींना अश्लील मेसेज (Obscene messages to girls) पाठवणाऱ्या एकाला मुंबईच्या पोलिसांनी (Mumbai Police)ताब्यात घेतलं, त्याची चौकशी मालाड पोलिसांकडून केली जात आहे. मुलींना मेसेज करुन त्रास देत होता. त्याचबरोबर नंबर ब्लॉक केल्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरुन त्रास द्यायचा. कंठाळलेल्या मुलीने पालकांच्या कानावर ही गोष्ट घातली. त्यानंतर पालकांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी अथक परिश्रम घेऊन आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपीचं नाव हर्ष शांतीलाल गिंद्रा (harsh shantilal gidra) (22) असं आहे.

नेमकं प्रकरण काय

अल्पवयीन मुलींना अश्लील मेसेज, अश्लील व्हिडिओ पाठवणाऱ्या एका आरोपीला मुंबईच्या मालाड पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अॅपच्या माध्यमातून मुलींचे नंबर मिळवायचा आणि त्यांना अश्लील मेसेज पाठवायचा. मुलींनी नंबर ब्लॉक केल्यास आरोपी दुसऱ्या नंबरवरून व्हिडिओ मेसेज पाठवायला सुरुवात करायचा.

मालाड येथे राहणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीनंतर मालाड पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपी हर्ष शांतीलाल गिंद्रा (22) याला ताब्यात घेतले. आरोपीच्या मोबाईलच्या तपासात आणखी अनेक मुलींना अश्लील मेसेज आणि अश्लील व्हिडिओ पाठवत असल्याची माहिती पोलिसांनी शोधली आहे.

विशेष म्हणजे ज्या मुलींना अश्लील मेसेज आणि व्हिडीओ पाठवले आहेत, त्या मुलींना पोलिसांनी जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यास सांगितले आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालाड रवींद्र अडाणे यांनी दिली.